Home उतर महाराष्ट्र अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

170

आशाताई बच्छाव

1001921294.jpg

अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल
अहिल्यानगर, प्रतिनिधी कारभारी गव्हाणे: तालुक्यातील वाकोडी परिसरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची भाची हिला ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.
अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्ह
घटनेची माहिती फिर्यादीला मिळाल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी सोमवारी (ता.१) सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.