Home नाशिक भगूरच्या स्मशानभूमी दुऱूस्तीसाठी मनसेचा भीक मांगो आंदोलनाचा इशारा

भगूरच्या स्मशानभूमी दुऱूस्तीसाठी मनसेचा भीक मांगो आंदोलनाचा इशारा

302

आशाताई बच्छाव

1001770635.jpg

भगूर प्रतिनिधी सुदर्शन बर्वे:-भगुर येथील स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा मनसे भगुर गावामध्ये भीक मागे आंदोलन करून दुरुस्ती करेल…

भगूर येथील स्मशान भूमीच्या अवस्था अत्यंत वाईट आहे. या स्मशानभूमीत अनेक समस्या आहेत, जसे की स्वच्छतागृहांमधील गैरसोय, कचऱ्याची विल्हेवाट, तसेच शेड गळणे आणि इतर काही मूलभूत सुविधांचा अभाव. यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसचे
स्मशानभूमीत पाऊस पडल्यास बसण्याची जागा पाण्याने साचते ज्यामुळे स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांची गैरसोय होते.
या समस्यांमुळे स्मशानभूमीची स्वच्छता आणि सोयीसुविधा यांमध्ये मोठी कमतरता आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिनांक. ११/६/२०२५ रोजी निवेदन दिले होते तरी पण नगर पालिका प्रशासनाने आज पर्यंत कोणतेही ठोस काम केलेले नाही, नगर पालिका प्रशासनाने हे काम तत्काळ सुरू केले नाही तर भगुर गावामध्ये भीक मागे आंदोलन करण्यात येईल व स्मशान भूमीची जी दुरावस्था झाली आहे ती गावकऱ्याच्या निधीतून भीक मागून दुरावस्था दूर करण्यात असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगुर तर्फे नगर पालिका प्रशासनाला स्मरण करून देण्यात येत आहे….
यावेळी मनसे शहराध्यक्ष श्री.सुमित चव्हाण व मनसे शहर उपअध्यक्ष श्री श्याम देशमुख, ईश्वर बर्वे, जालिंदर सूर्यवंशी, शुभम देशमुख, अनिकेत वावधणे,मयुर चव्हाण,वरुण घोरपडे, सोनू देशमुख,किरण गोडे, व कार्यकर्ते उपस्थित होते.