Home धाराशिव संजय गांधी योजना च्या ढिसाळ कारभारामुळे निराधार त्रस्त

संजय गांधी योजना च्या ढिसाळ कारभारामुळे निराधार त्रस्त

412

आशाताई बच्छाव

1001762513.jpg

संजय गांधी योजना च्या ढिसाळ कारभारामुळे निराधार त्रस्त धाराशिव उमरगा: संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी सह अनुदान योजनेतील सहा महिन्यांच्या मिटींगमध्ये फक्त तिनच महिन्याचेच अर्ज घेतले जात आहेत तसे न करता पुर्ण सहा महिन्यांचे अर्ज घेऊन निकाली काढण्यात यावे यासाठी तहसील कार्यालय उमरगा यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचे अर्ज तहसील कार्यालयात केले जाते.परंतु तहसील कार्यालय उमरगा यांचे मार्फत सहा महिन्यांच्या मिटींग/ बैठकीत तिनच महिन्यांचेच अर्ज निकाली काढले जात आहे. तिनच महिन्यांच्या अर्जाना मंजुरी देण्यात येत आहे. संबंधित विभागाने तसे न करता सहा महिन्यांचे अर्ज या मिटींग मध्ये निकाली काढण्यात यावे.यामुळे अर्जदारांना वर्षेभर तहसील कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.या ढिसाळ नियोजनामुळे गरजू ,दिव्यांग, वंचित घटकांची तारांबळ उडत आहे.या योजनेची खरोखरच आवश्यकता आहे, त्यांना वर्षानुवर्षे वंचित रहावे लागत आहे.याचा गांभीर्याने विचार तहसील कार्यालयातील संबंधित विभागाने करण्याची गरज आहे.लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने,दिव्यांग आघाडी जिल्हाउपाध्यक्ष इसाक शेख, तालुका अध्यक्ष रामेश्वर मदने, राहुल मन्नाडे, गुंडू लेंडवे, अभिषेक पाटील, श्रावण कांबळे, शंकर लोंढे,काशिबाई हजारे, सरस्वती पवार,गिरजाबाई लोंढे,हुजूर मुल्ला, महेश इंगळे, विठ्ठल फत्तेपूरे,माधव मुगळे, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Previous articleदहिवड शिवारात दहशत माजवणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद
Next articleदेगलूर महाविद्यालयची खेळाडू कु.दिक्षा जोगे विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.