आशाताई बच्छाव
देगलूर महाविद्यालयची खेळाडू कु.दिक्षा जोगे विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व राजर्षी शाहू कॉलेज,लातूर येथे दि.28/07/25 रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय जलतरण स्पर्धेत देगलूर महाविद्यालयची कु.दिक्षा दिपक जोगे या खेळाडूने 100 मी फ्रीस्टाईल व 200 मी फ्रिस्टाईल मध्ये सुवर्ण पदक तर 50मी फ्रीस्टाईल मध्ये रजत पदक पटकावत देगलुर महाविद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,
उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार, नारायणराव मैलागिरे,सूर्यकांत नारलावार,गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार,गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर,गोविंदप्रसाद झंवर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ,उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार,उपप्राचार्य प्रा. चमकुडे एम.एम. उपप्राचार्य डॉ.शेरिकर व्ही.जी.,पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील,कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी आभिनंदन केले आहे.






