Home बुलढाणा एलसीबी पथकाची मोठी धडक – लोणारमध्ये ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एक...

एलसीबी पथकाची मोठी धडक – लोणारमध्ये ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एक जण अटकेत ! लोणार (जि. बुलढाणा)

86

आशाताई बच्छाव

1001709177.jpg

एलसीबी पथकाची मोठी धडक – लोणारमध्ये ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एक जण अटकेत ! लोणार (जि. बुलढाणा)
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
एलसीबी पथकाची मोठी धडक – लोणारमध्ये ५ किलोहून अधिक गांजा जप्त, एक जण अटकेत !
लोणार (जि. बुलढाणा) – मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे साहेब, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा एलसीबी पथकाने अवैध गांजा साठ्यावर मोठी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे.दिनांक ९ जुलै २०२५ रोजी बंजारा तांडा, लोणार येथे गणेश जाधव (वय ५०) या व्यक्तीने स्वतःच्या घरात अवैधरित्या गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. पथकाने तातडीने छापा टाकत ५ किलो ३२२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची अंदाजित बाजारभावातील किंमत १ लाख ६ हजार ४४० रुपये इतकी आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध अप. क्र./२०२५, कलम ८ (क), २० (ब) (ii) (२) NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन लोणार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई यशस्वी करण्यासाठी एलसीबी पथकातील खालील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

API संजय मातोंडकर

ASI ओमप्रकाश सावळे

ASI राजकुमार राजपूत

HC दिगंबर कपाटे

LHC वनिता शिंगणे

PC मंगेश सनगाळे

PC दीपक वायाळ

PC निवृत्ती पुंड (LCB)

HC संतोष चव्हाण

PC अनिल शिंदे

PC गजानन डोईफोडे (पो.स्टे. लोणार)
एलसीबी पथकाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध मादक पदार्थ विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून जिल्ह्यातील अशा अवैध धंद्यांवर एलसीबीचे लक्ष राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.