आशाताई बच्छाव
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द कृषी मंडळात हुमणीचे थैमान कृषी केंद्र वाले वीर्य खताच्या नावावर शेतकऱ्याची आर्थिक लुट कृषी खात गप्प का? चर्चेला उधान .
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :- चिखली तालुक्यातील मेरा खु मंडळामध्ये अंत्री खेडेकर मेरा बुद्रुक मनुबाई असोला इत्यादी गाव येतात या भागांमध्ये यावर्षी सोयाबीन पिकाला बगल देत सोयाबीन ऐवजी आता मका पिका कडे या भागातील शेतकरी वळले आहेत लोकांनी मका पिकाची लागवड केली आहे आणि या मका पिक वाढीसाठी विर्या खताची नितांत गरज मकाला असते याचाच फायदा घेत कृषी केंद्र वाले तेजी बॅग 230 रुपयाला भेटते तीच बॅग 300 ते 325 रुपयाला शेतकऱ्याच्य माती मारत आहे त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक लुट होत आहे या बाबीकडे कृषी खात्याचे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही कृषी विभाग अधिकारी यांना आपल्या कामाचा विसर पडला की काय अशी सुद्धा चर्चा मेरा खुर्द मंडळा मध्ये सुरू आहे अंत्री खेडेकर मेरा तुखात शेतकरी डुमणी अळीच्या प्रादुर्भावाने संकटात आले आहे मागील वर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्याचे कबरडे मोडले आहे मेरा खुर्द मंडळामध्ये मागच्या वर्षी दरडोई उत्पन्न कमी झाले आणि त्या मालाला भाव नसल्यामुळे या भागातील शेतकरी आधीच अस्मानी सुलतानी आणि बँकेच्या कर्जाच्या ओजाखाली असतानाच यावेळी सुद्धा हुमणी आळीने मेरा खुर्द मंडळामध्ये चांगलेच थैमान घातले आहे आणि ते अटक्यात येत नाही असे लक्षण दिसत असल्यामुळे मेरा खुर्द मंडळा मध्ये गावातील शेतकरी हवालद्दील झाले आहे आता शेतकऱ्यांनी काय करावे जगावे की मरावे असा एकच प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला आहे






