Home जालना सीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व ट्युशन ची तपासणी करून कारवाई करा...

सीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व ट्युशन ची तपासणी करून कारवाई करा शिक्षण उपनिरीक्षक यांचे शिक्षणअधिकारी यांना आदेश

126

आशाताई बच्छाव

1001657917.jpg

सीसीटीव्ही नसलेल्या सरकारी खाजगी शाळा व ट्युशन ची तपासणी करून कारवाई करा शिक्षण उपनिरीक्षक यांचे शिक्षणअधिकारी यांना आदेश

पायल बुलबले यांच्या निवेदनची दखल

जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

शासन नियमानुसार सर्व खाजगी सरकारी शाळा व ट्युशन यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवीणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असताना अजुन बर्याच खाजगी शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे.तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र देखिल करण्यात येत नसल्याचे आढळून आले आहे यामुळे
सीसीटीव्ही नसलेल्या व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र नसलेल्या सरकारी, खाजगी शाळा व ट्युशन च्या परवानगी रद्द करा अशी मागणी पायल जगदीश बुलबुले यांनी शिक्षण उपसंचालक यांच्या कडे नियोदना द्वारे केली होती त्या नियोदना ची दखल घेऊन सर्व शिक्षण अधिकारी यांनी शाळाची तपासणी करून ज्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र केलेली नाही अशा शाळा व ट्युशन वर उचित करावी व तसे शिक्षण उपसंचालक कार्यालयस कळवावे असे पत्र शिक्षण उपनिरीक्षक यांनी सर्व शिक्षण अधिकारी यांना काढले आहे.