आशाताई बच्छाव
पंढरपूर ला जाणाऱ्या वारकऱ्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले मित्र परिवाराकडून जिवनाश्यक वस्तू, औषधं किट वाटप
(शिंदखेडा प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा शहरातुन पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचे शिंदखेडा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले मित्र परिवाराच्या वतिने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. वारकरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावरची भक्तीभावाची चमक आणि विठुरायाचा गजर सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला. सुरज देसले मित्र परिवार यांच्या वतिने वारकरी माय बाप आणि बंधू, भगिनीना जिवनाश्यक वस्तू, औषधे किट वाटप करण्यात आल. शिंदखेडा शहरातुन सकाळी ७ वाजता व सायंकाळी ७ वाजता अश्या दोन सत्रात बसेस पंढरपुर कडे रवाना झाल्या. यावेळी सुरज देसले, शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, उदय वानखेडे, देविदास देसले, सतीश महाराज, माऊली पाटील, तुषार पाटील, प्रकाश गिरासे, भूषण मराठे, संजय पाटील यासह वारकरी उपस्थित होते.






