Home जालना संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते...

संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव  आदमाने यांचा इशारा

85

आशाताई बच्छाव

1001657819.jpg

संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू; सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव  आदमाने यांचा इशारा

जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ –भाजपने 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने शासकीय कार्यालयात देखील तसे फलक लावण्यात आले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. महेश धन्नावत यांनी आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवार दि. 27 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. शिवाजीराव आदमाने यांच्यासह काही वकीलांनी देखील आक्षेप नोंदविला आहे. जर संविधान हत्या दिवस साजरा कराल तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय.
जालन्यात वकीलांनी संविधान हत्या दिवस साजरा करण्याला आक्षेप भारतीय संविधान अस्तित्वात आहे. त्यामुळेच लोकशाही असलेला देश संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. त्याचा भारतीय नागरिकांना त्याचा अभिमान आहे
दि. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्विकारल्या पासुन सर्व देश हा संविधानाप्रमाणे चाललेला आहे व भारतीय संविधान हे एक पुस्तक नसून पवित्र ग्रंथ आहे. त्यामुळे सर्व भारतीयांच्या मनात संविधानाचे स्थान आहे. असे असतानाही दि 25 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान हत्या दिवस 2025 या फलक लावण्यात आला. हा प्रकार भारतीय नागरीकांची दिशाभूल करणारा, संतापजनक आणि भावना दुखविणारा आहे. भारतीय संविधान हत्या म्हणजे भारतीय संविधान संपले आहे असा त्याचा सरळ अर्थ आहे. हत्या झाल्यानंतर कोणतीही वस्तु शिल्लक राहत नाही. किंवा अस्तित्व राहत नाही आणि असे असेल तर संविधानाची हत्या कोणी केली? त्यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली? असे प्रश्न भारतीय नागरीकाना पडणे स्वभावीक आहे. संविधानाची हत्या झाल्या पासून भारत देशाचा कारभार मागील 50 वर्षापासून कसा चालत आहे? अस सवाल वकीलांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.