Home जालना महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय -लेखा संवर्गीय वेतन त्रुटी व पदोन्नती स्तर कृती समितीची...

महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय -लेखा संवर्गीय वेतन त्रुटी व पदोन्नती स्तर कृती समितीची राज्यस्तरीय बैठक जालना येथे संपन्न

78

आशाताई बच्छाव

1001657798.jpg

महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय -लेखा संवर्गीय वेतन त्रुटी व पदोन्नती
स्तर कृती समितीची राज्यस्तरीय बैठक जालना येथे संपन्न
जालना, (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व शासकीय
लिपिकवर्गीय-लेखा संवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणीतील त्रुटी निवारण
व पदोन्नती स्तर निर्धारणासाठी गठीत महाराष्ट्र राज्य कृती समितीची
राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक २८ जून रोजी  जालना जिल्हा परिषदेच्या कै.
यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली.
या बैठकीस मुख्य निमंत्रक बलराज मगर, समितीचे निमंत्रक अशोक डहाळे,
बापूराव पुजरवाड, सागर बाबर, लेखा संघटना अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष
जेजुरकर, शालीन माऊलीकर, राज्य कृती समितीचे सक्रिय सदस्य शरद बिरादार,
आनंद भिसे,विशाल परदेशी, पंकज गुल्हाने, अरुण जोरवेकर, बापूसाहेब
कुलकर्णी, उमाकांत सूर्यवंशी, पवन तलवारे, सलीम पटेल, अशोक कासराळीकर,
माधवी पुरी, तसेच लातूर जिल्हाध्यक्ष सुजित कमलापुरे,चंद्रकांत हवा,
बालाजी मुतंगे, संग्राम भिंगोले, बद्रीनाथ सुरवसे, आनंद ढगे आणि
राज्यभरातील लिपिकवर्गीय कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक पदनामामध्ये बदल करून ‘जिल्हा परिषद विकास
अधिकारी’ हे पदनाम देण्यात यावे आणि त्यांना एस-१५ वेतनश्रेणी लागू
करावी. कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्य प्रशासन अधिकारी या पदनामामध्ये
बदल करून ‘जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी’ हे नवीन पदनाम देण्यात यावे व
त्यांना एस-१८ वेतनश्रेणी लागू करावी. या मागण्या इंडियन यूनियनच्या
वतीने मांडण्यात आल्या आणि त्यास कृती समितीतील सर्व संघटनांनी एकमताने
पाठिंबा दिला. याबाबतचा ठराव तातडीने कृती समितीच्या लेटरपॅडवर शासनाकडे
येणार्‍या दोन दिवसांत सादर करण्याचे ठरले