Home बुलढाणा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बनावट परवानगी देणे भोवले ?

सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बनावट परवानगी देणे भोवले ?

81

आशाताई बच्छाव

1001652449.jpg

सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बनावट परवानगी देणे भोवले ?

नगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल नगरपंचायतचा 10 लाखांचा कर बुडवला
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मोताळा – शहरालगत असलेल्या नगरपंचायतच्या
हदीत सुरू असलेली ओ 2 पावर प्रायव्हेट लिमिटेड व सायकलीक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मोताळा या कंपनीला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी बनावट परवानगी देणे भोवले असून एक महिन्यानंतर २८ जून रोजी रात्री उशीरा नगराध्यक्षांसह पाच जणांवर बोराखेडी पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर पंचायत हद्दीत ओ २ पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सायकलीक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मोताळा या नावाने कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्प व्यवसाय सुरू केला. सदर व्यवसाय सुरू करते वेळी कंपनीने नगरपंचायतची कुठलीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या प्रकल्प उभारला. याप्रकरणी नगरपंचायतचे कर्मचारी संतोष इंगळे यांनी २८ मे 2025 रोजी सदर कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीतून केली होती.
यानंतर सपोनि बालाजी
शेंगेपल्लू यांनी चौकशी
केली असता यामध्ये ओटू
पॉवर प्रायव्हेट लिमिटेड,
सायकलीक एनर्जी पॉवर
प्रायव्हेट लिमिटेड,
मोताळा यांच्या वतीने
महेश सहाणे, शांताराम
लोखंडे यांनी स्वीकृत
नगरसेवक अमोल देशमुख यांच्या मदतीने परवानगीसाठी
नगरपंचायतचे लिपिक सुनील मिरकुटे यांच्याकडे नोंद करून नगराध्यक्ष
माधुरी देशमुख यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. मात्र अमोल देशमुख यांनी सन पॉवर इंडिया व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कामासाठी नेमलेले महेश लोखंडे दरम्यान, नगरपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्राची कंपनीकडे मागणी केली असता कंपनीने ई मेल द्वारे पाठवलेले ठराव, नाहरकत प्रमाणपत्र खोटे आणी बनावट आढळून आले असून महेश सहाणे, शांताराम लोखंडे यांना परस्पर कागदपत्रे दिले चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी स्वीकृत नगरसेवक अमोल शिवाजीराव देशमुख, महेश दिलीप सहाणे, शांताराम सुपडा लोखंडे, नगराध्यक्ष माधुरी पुरुषोत्तम देशमुख, लिपिक सुनील ओंकार मिरकुटे यांनी खोटे नाहरकत प्रमाणपत्र व ठराव कंपनीला देऊन नगरपंचायत कर, विकास शुल्क, बांधकाम शुल्क, वृक्षतोड परवानगी शुल्क असा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त शुल्क बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,467,468,34 भादवी 1860 अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. “पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कपले हे करत आहेत. बनावट परवानगी वापरून नगरपंचायतचा लाखो रुपयांचा कर बुडवला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र बनावट दस्तऐवज तयार करून सोलर कंपनीने प्लांट्ची उभारणी केली. नगरपंचायत कडून कोणताही अधिकृत कर न भरता प्रत्यक्षरीत्या नगरपंचायत प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला आहे.सोलर प्लांट प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता सोलर प्लांट बनावट परवानगी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलर प्लांटचे नावाखाली बनावट कागदपत्रांच्या आधारे कर बुडवणाऱ्या घटकांवर आता कायदेशीर कारवाईला वेग आला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही.बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; मात्र सोलर कंपनीवर कारवाई कधी होणार सोलर प्लांट प्रकल्प उभारण्यासाठी बनावट दस्ताऐवज तयार करून देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या कंपनीवर तसेच बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या सोलर प्लांट कंपनीवर प्रशासन केव्हा कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.