Home उतर महाराष्ट्र विरदेल ते पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांना घेऊन एसटी बस मार्गस्थ

विरदेल ते पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांना घेऊन एसटी बस मार्गस्थ

367

आशाताई बच्छाव

1001649020.jpg

विरदेल ते पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांना घेऊन एसटी बस मार्गस्थ

(३६, वर्षाची परंपरा आज पण सुरू)

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती” या फक्त गाण्याच्या ओळी नाही तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील भावना आहेत.. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा असा हा पंढरीचा राजा एकमेव देव आहे ज्य़ाला माऊली म्हटलं जातं. या माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातो..असा हा भक्तीचा मेळा दरवर्षी आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जमा होतो… या वर्षी हि विरदेल गावातील व परिसरातील मोठ्या प्रमाणात वारकरी दोन (एस.टी.)बसेस ने आज सकाळी १०. वाजता पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी मार्गस्थ झाले..
गेल्या ३६ वर्षां पासून विरदेल गावातील वारकरी जात आहे.असे
ह.भ.प. श्री. दगडू सोनू शिंपी यांनी सांगितले.. विरदेल येथील विठ्ठल मंदिरा पासून या S.T बसेस निघाल्या… त्याप्रसंगी वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांडुरंगाच्या व संतांच्या जयघोषात वारकरी पंढरीकडे निघाले, यामुळे विरदेल गावातील वातावरण भक्तिमय झाले होते.