Home उतर महाराष्ट्र छावा युवा संघटनच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

छावा युवा संघटनच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

116

आशाताई बच्छाव

1001642420.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी-‘छावा युवा संघटन महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्ष फत्तेसिंगराजे तथा बाबासाहेब भोसले पाटील ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.