Home भंडारा राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पवनीच्या वतीने तहसीलदार सोनवणे पवनी यांना निवेदन

राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पवनीच्या वतीने तहसीलदार सोनवणे पवनी यांना निवेदन

344

आशाताई बच्छाव

1001628574.jpg

राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पवनीच्या वतीने तहसीलदार सोनवणे पवनी यांना निवेदन

 

संजीव भांबोरे
भंडारा_दिनांक 10 जून 2025 रोज मंगळवार ला शासकीय कामावर असताना झालेल्या चक्रीवादळामुळे मरण पावलेली सौ.महानंदा प्रदीप वाकडीकर व जखमी झालेली श्रीमती सीता रामा अवसरे दोन्ही राहणार बजरंग वार्ड पवनी तालुका पवनी जिल्हा भंडारा यांना शासनाच्या कडून आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता तहसीलदार पवनी यांचे मार्फत मा.ना. पालकमंत्री संजय सावकारे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
मौजा वेळवा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथील मशानभूमीचे शासकीय निधीमधून सभा मंडपाचे बांधकाम सुरू होते. त्यावेळेस सायंकाळी 05 वाजताची दरम्यान फार मोठे चक्रीवादळ आले.तेव्हा त्या कामावर सौ. महानंदा प्रदीप वाकडीकर आणि श्रीमती सीता अवसरे ह्या दोन महिला व चार पुरुष सभा मंडपाच्या बांधकामावर लोह्याची चटई बांधण्याचा काम करीत होते.त्यावेळेस अचानक मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आले आणि दोन्ही महिला लोह्याची चटई सहित हवेमध्ये उडून लोह्याच्या चटई खाली कोसळून पडल्या. त्यावेळेस दोन्ही महिला बेहोश झाल्या होत्या घटनास्थळावरून दोन्ही महिलांना भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यामध्ये सौ. महानंदा प्रदीप वाकडीकर ही दवाखान्यातच रात्री 12 वाजता दरम्यान मरण पावली व श्रीमती सीता अवसरे ही महिला खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
दोन्ही महिला ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातील चांभार समाजाच्या असून दोघांचेही महाराष्ट्र शासन कामगार विभाग इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्डधारक आहेत. मरण पावलेली सौ.महानंदा वाकडीकर हिला एक मुलगा व एक मुलगी असून मुलगी दहावा वर्ग उत्तीर्ण झालेली आहे त्यातच मुलगा हा सातव्या वर्गात आहे महानंदाचे पती मजुरीचे काम करत असल्यामुळे तिला सुद्धा मोल म्हणजे ते काम करावे लागत होते. व त्यातच येणाऱ्या मजुरीच्या पैशातून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलाचे शिक्षण पाणी करावे लागत होते.महानंदाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे महानंदाच्या मुलीवर आर्थिक डोंगर कोसळले आहे. व त्यामुळे तिच्या परिवारातील मुला मुलींना आर्थिक मदत मिळाल्यास तिच्या मुलांचे भविष्यातील शिक्षण व उदरनिर्वाह करणे सोपे जाईल.सीताबाई अवसरे ही सुद्धा मोल मजुरी करीत असून तिचे पतीचे निधन झालेले असून तिच्या मुलाचे लग्न झालेले आहे व तिचा मुलगा हा आपल्या पत्नीसह वेगळा राहत आहे. सीताबाईचा वरील कामावर असताना अपघात झाल्यामुळे ती भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.व त्या पुढील उपचार सुरू आहे सीताबाई हिला दवाखान्याचा जवळपास 70 हजार रुपये खर्च आलेला असून पुढेही तिला औषध उपचारासाठी खर्च लागणार आहे व सीताबाई ही भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मजुरीचे कामे करू शकत नाही.त्यामुळे तिचे म्हातारपण चांगले जावे याकरता तिला शासनाद्वारे तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे. करिता विनंती आहे की,दोन्ही महिला गरीब कुटुंबातील असून पीडित परिवाराला आर्थिक सहाय्य शासनाच्या वतीने देण्याची कृपा करावी हीच नम्र विनंती.निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा राष्ट्रीय चर्मकार जिल्हाध्यक्ष सुरेश अवसरे,राज्य कार्यकारिणी सदस्य एड.राहुल बावणे,एड. विद्यानंद बनारसे, अनुराग सुतारे, अंकुश वाकडीकर, अजय वाकडीकर, संघर्ष अवसरे,गणराज वाकडीकर, पवन वाकडीकर, प्रशांत लोखंडे,शरद लोखंडे, प्रदीप वाकडीकर, कार्तिक वाकडीकर, प्रफुल्ल अवसरे, श्रीहरी अवसरे,इत्यादी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.