Home बुलढाणा EXCLUSIVE स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणावर अजितदादांचा भावनिक प्रतिसाद – ‘मी स्वतः लक्ष...

EXCLUSIVE स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणावर अजितदादांचा भावनिक प्रतिसाद – ‘मी स्वतः लक्ष घालतो’, CID चौकशीचे निर्देश!

49
0

आशाताई बच्छाव

1001623204.jpg

EXCLUSIVE स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणावर अजितदादांचा भावनिक प्रतिसाद – ‘मी स्वतः लक्ष घालतो’, CID चौकशीचे निर्देश!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
खामगाव :- बुलडाणा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते स्व. पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात अखेर जनतेचा आवाज पोहोचला! राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार १२ जून रोजी खामगाव दौऱ्यावर आले असता, स्व. देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीचे नेते रंगराव देशमुख यांनी त्यांच्यासमोर थेट या प्रकरणाचे वास्तव मांडले. सीआयडीमार्फत चौकशी करून देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावेळी सुनीता पंकज देशमुख, कुटुंबीय व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण माहिती ऐकून दादा गहिवरले. त्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आणि “या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालीन,” असे ठाम आश्वासन देत देशमुख कुटुंबीयांना आणि जनतेला आश्वस्त केले.

दरम्यान, पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून, एका मोठ्या कटाचा भाग होता, अशी जोरदार चर्चा जिल्हाभर आहे. ही घटना केवळ जळगाव मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेच्या मनात थैमान घालत आहे. गावोगावी, चौकाचौकांत दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चा आता जाहीर उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत ! जातीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जळगाव जामोद मतदारसंघात शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा असलेली जनता असूनही, काही सत्तेच्या हव्यासापोटी तयार झालेल्या लोकांनी समाजात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हीच मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी निष्पाप लोकांचे बळी देत असल्याचा आरोप होतोय.

Previous articleबापरे ! तब्बल 4 बिबट्यांचा म्हाडा कॉलनी परिसरात मुक्तसंचार ! – वन विभागाची रेस्क्यू टीम तैनात !
Next articleजुन्या वादातून बेदम मारहाण; उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू ! शेगाव तालुक्यात खळबळ! तिघांना अटक….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here