Home भंडारा अबब ! इटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची अशीही दुर्दशा

अबब ! इटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची अशीही दुर्दशा

30
0

आशाताई बच्छाव

1001623055.jpg

.अबब ! इटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची अशीही दुर्दशा

पटसंख्या 45 असलेल्या १ ते ४ वर्गाकरिता एकच शिक्षक

एक शिक्षक रिटायर झाल्यामुळे संपूर्ण शाळेची धुरा मुख्याध्यापकावर

संजीव भांबोरे
भंडारा- तालुक्यातील ईडगाव पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते ४ वर्ग असून या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या एकूण 45 आहे .परंतु या शाळेतील एक शिक्षक मागील ६ महिन्यापासून रिटायरमेंट झाल्यामुळे संपूर्ण शिक्षणाची धुरा मुख्याध्यापकावर आलेली आहे .त्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे की शाळेवर नियंत्रण ठेवावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे? जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची अशी दुर्दशा असेल सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी आपल्या मुलांना कुठे शिकवावे असा प्रश्न निर्माण होतो! कारण एक शिक्षक कसे काय १ ते ४ वर्गांना शिकवणार की शाळेची जबाबदारी सांभाळणार ! असा प्रश्न निर्माण होत आहे. व शाळेचा होणारा बट्ट्याबोळ थांबवावे.जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ याकडे लक्ष घालून ईटगाव वासियांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा रस्त्यावर येऊन शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती, गावातील सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here