Home नाशिक राजेंद्र पाटील राऊत यांना जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहिर,२९ जुनला होणार विशेष समारंभात...

राजेंद्र पाटील राऊत यांना जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहिर,२९ जुनला होणार विशेष समारंभात पुरस्कार प्रदान

360

आशाताई बच्छाव

1001615102.jpg

राजेंद्र पाटील राऊत यांना जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहिर,२९ जुनला होणार विशेष समारंभात पुरस्कार प्रदान
(ॲड विनया नागरे प्रतिनिधी)
नाशिक: युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना “जीवनगौरव पुरस्कार २०२५” जाहिर झाला असून,याबाबतची अधिकृत घोषणा आज नाशिक येथे मनुमानसी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.मेघा राजेश शिंपी व महावीर इंटरनँशनलचे अध्यक्ष अनिल नहार यांनी केली.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व विविध क्षेत्रात कार्यरत राहून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना “जीवनगौरव पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित केले जाणार आहे.राजेंद्र पाटील राऊत यांनी आपल्या आयुष्यातील वाटचाल ही खडतर मार्गाने करून संघर्षालाच आपलेसे करून अनेक गोरगरीबांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी त्यांनी संघर्षात्मक पाऊल उचलत अगदी धाडसीपणाने संघर्षातून लढा उभारला व अनेकांना न्याय मिळवून देण्याचे मोलाचे कार्य केले.त्यामुळेच राजेंद्र पाटील राऊत यांना त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान म्हणून “जीवनगौरव पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित केले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिंपी व नहार यांनी सांगितले.
हा पुरस्कार वितरण समारंभ रविवारी २९ जुन २०२५ रोजी नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती शेवटी संस्थेने दिलेल्या पत्रकातून दिली आहे.

Previous articleशिवांनी हांडेच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना अन्नदानाचे वाटप !
Next articleघरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.