Home बुलढाणा सोलर घोटाळ्यात गुन्हे दाखल करा. शेत रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमित रस्ते मोकळे...

सोलर घोटाळ्यात गुन्हे दाखल करा. शेत रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमित रस्ते मोकळे करा.. अन्यथा लॉग मार्च काढू… आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठेंचा प्रशासनाला इशारा.

85

आशाताई बच्छाव

1001595239.jpg

सोलर घोटाळ्यात गुन्हे दाखल करा. शेत रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमित रस्ते मोकळे करा.. अन्यथा लॉग मार्च काढू… आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठेंचा प्रशासनाला इशारा.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- मोताळा मोताळा नगर पंचायत हद्दीमध्ये झालेल्या सोलर घोटाळ्याबाबत सीओ गणेश पांडे यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात कंपनी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर 12 ते 13 दिवस उलटून ही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नसल्याने तात्काळ सोलर कंपनी विरोधात गुन्हे दाखल करावे, जिल्ह्यातील शेत रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमण मुक्त करावे, जिल्ह्यातील साफसफाई कंत्राटदारावर कारवाई करावी, सारोळा मारोती ग्रामसेवक विलास शिवदे यांना निलंबित करावे, यासह इतर मागण्यांची त्वरित पूर्तता करावी. अन्यथा मोताळा ते बुलढाणा पर्यंत पैदल लॉग मार्च काढू असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठेंनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. सतीशचंद्र रोठे यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद सीईओ गुलाबराव खरात, कॅफो प्रकाश राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी ग्राम स्वराज्य समिती चे कमलाकर व्यवहारे, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मे. ओ 2 रिन्यूबेवल एनर्जी प्रा. ली. या कंपनीने मोताळा नगर पंचायत हद्दीमध्ये व्यावसायिक सोलर प्लांट उभा केला आहे. हा प्लांट उभा करण्यासाठी मोताळा नगर पंचायत यांची बनावट एनओसी तयार करण्यात आली. एनओसी वर सीओंची बनावट सही व बनावट शिक्क्याचा वापर केला. पंचायतचा टैक्स बुडवण्यासाठी बोगस एनओसी तयार करून फसवणूक केल्याची बोराखेडी पोलीस ठाण्यात सीओ गणेश पांडे यांनी एका कर्मचाऱ्यांला प्राधिकृत करुन 28 मे रोजी तक्रार दाखल केली. असे असतांना 12 ते 13 दिवस उलटून ही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही.

Previous articleअहिल्यानगर येथील ‘विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल’ निर्मित महाविद्यालयाच्या वास्तूचं उद्घाटन संपन्न
Next articleतूफानी पावसाने बुलढाण्याला झोडपले ! – विजांच्या कडकडाटाने -उरात धडकी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.