Home बुलढाणा तूफानी पावसाने बुलढाण्याला झोडपले ! – विजांच्या कडकडाटाने -उरात धडकी !

तूफानी पावसाने बुलढाण्याला झोडपले ! – विजांच्या कडकडाटाने -उरात धडकी !

117

आशाताई बच्छाव

1001595253.jpg

तूफानी पावसाने बुलढाण्याला झोडपले ! – विजांच्या कडकडाटाने -उरात धडकी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा वातावरणात अचानक बदल होऊन आज सायंकाळी साडेचार च्या सुमारास तुफानी पावसाने बुलढाण्याला झोडपून काढले. धुव्वादार पावसात विजांच्या कडकडाटाने नागरीकांच्या उरात धडकी भरवली होती.जिल्ह्यात 15 जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन कृषि विभागाने देखील केले. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे आज जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह साडेचार वाजता वादळी पाऊस झाला. पावसा सोबतच वाऱ्याचा जोर ऐवढा होता की, जिल्ह्यातील काही भागात टिनपत्रे उडाली. वृक्ष उन्मळून पडले. विद्युत तारा लोंबकळून विद्युत प्रवाह बंद झाला होता. या वादळी पावसामूळे काही वेळ जनजिवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे बरेच नुकसान झाले असून, अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.