Home जालना ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी...

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल

116

आशाताई बच्छाव

1001578060.jpg

ग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत
जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल
भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा..शिवसेनेच्या घोषणेने परिसर दणाणला
जालना, दि. ७ (प्रतिनिधी दिलीप बोंडे)- जालना येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात
शिवसैनिकांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ग्यानबा तुकाराम.. आश्वासनांचे किती
झाले काम.? व भाऊ आणि दादा क्या हुआ तुम्हारा वादा.. असे म्हणत सत्ताधारी
पक्षाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकत्र येऊन जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात जाब विचारला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, तालुकाप्रमुख हरिहर
शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले,
युवा सेनेचे भरत सांबरे, माजी नगरसेवक जे.के.चव्हाण, गंगुताई वानखेडे,
संदीप नाईकवाडे, माजी जि.प.सदस्य बबनराव खरात, दलित आघाडीचे जिल्हासंघटक
रविकांत जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे निवेदन करताना शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आमदार खोतकर यांच्यासमोर निवडणूक
काळात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दिलेली शेतकर्‍यांना कर्जमुक्ती
देणार, सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देणार, लाडक्या बहिणींना
एकवीसशे रुपये देणार, ४४ हजार गावात पानंद रस्ते बांधणार, शेतकर्‍यांच्या
खते बियाणे यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणार,त्यावरील एसजीएसटी अनुदान
स्वरूपात वापस देणार, एक रुपयात पिक विमा देणार, वृद्धांना पेन्शन
स्वरूपात २१ रुपये देणार, अन्नदात्याला ऊर्जात आता बनवून २४ तास वीज
देणार,शेतमालाला हमीभाव देणार, हर घर जल हर घर छत देणार, मराठवाडा वॉटर
ग्रीडला केंद्राकडून मान्यता घेणार अशा दिलेल्या विविध आश्वासनांचा पाढा वाचण्यात आला.

Previous articleवनसगाव येथील गणेश जोशी गुरु ज्योतिष भूषण पुरस्काराने सन्मानित
Next articleखडक माळेगाव येथे मामाच्या गावाला आलेल्या मुलाचा शेततळ्यात पडून मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.