Home धाराशिव समाजसेवक भूमिपुत्र वाघ यांचा विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा.

समाजसेवक भूमिपुत्र वाघ यांचा विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा.

98
0

आशाताई बच्छाव

1001575898.jpg

धाराशिव उमरगा प्रतिनिधी: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील समाजसेवक, लेखक, दिग्दर्शक ,चित्रपट निर्माते साहित्यिक म्हणून कार्यरत असलेले कळंब तालुक्यातील सातेफळ या गावचे सुपुत्र भूमिपुत्र वाघ यांचा विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.मॉर्निंग वॉकच्या वतीने सकाळी सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला .त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे शल्य चिकित्सक जाधव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये मॉर्निंग वॉक चे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अनाथाची माय विद्याताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जन्म झालेल्या सर्व लहान बाळासाठी नव्या कपड्याची भेट देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले .त्यानंतर सायंकाळी शिवपुरी रोड या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर मॉर्निंग वॉक मधील सदस्यांना केशर आंब्याच्या झाडाची रोपे देण्यात आली .वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्याताई वाघ मॉर्निंग वॉक चे सर्व सदस्य मित्रपरिवार उपस्थित होते. त्यासोबतच भूमिपुत्र वाघ यांचे गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकर यांची ६१ साजरी करण्यात आली .त्यांच्या ६१ निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याबद्दल वाघ यांनी माहिती दिली. या विविध कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब माने ,विकास गायकवाड ,अॅड येळीकर,बाबरे साहेब ,लोखंडे साहेब ,इंजिनियर सूर्यवंशी साहेब ,शिवानंद दळगडे सर, डॉ. भाऊसाहेब उगले सर, आप्पा जाधव, रामभाऊ पतंगे ,इंगोले सर ,नाबदे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते .भूमिपुत्र वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयामध्ये कविता पवार यांनी एक लाख 17 हजार रुपयाची कपडे देऊन उपरोक्त केले महाराष्ट्रातून महाराष्ट्र लोकविकास मंच, उत्तरदायित्व एनजीओ नेटवर्क आणि मित्रपरिवातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here