Home जालना भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे शिवराज्याभिषेक सोहळाउत्साहात साजरा

भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे शिवराज्याभिषेक सोहळाउत्साहात साजरा

49
0

आशाताई बच्छाव

1001575191.jpg

भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे शिवराज्याभिषेक सोहळाउत्साहात साजरा
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने व तरुणाईच्या उत्साहाने पारध धनगरी दुमदुमून गेली होती पारध बु येथील मुख्य बस स्थानक परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक असून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने पारध बु नगरीतील अठरापगड जातीतील विवाहित जोडप्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली यावेळी शिवस्मारक समितीचे सर्व सदस्य पत्रकार बंधू सागर देशमुख यांनी या सोहळ्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे या सोहळ्याच्या निमित्ताने दोन ते तीन दिवसापासून सर्व तरुणाई उत्साहाने कामाला लागली होती तो आनंदाचा क्षण आज सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला या महासोहळ्यामध्ये तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने सर्व बस स्थानक दणाणून सोडले होते तरुणाईच्या जोशाने व घोषणेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला यावेळी गावातील शासकीय राजकीय सामाजिक विद्यार्थी विद्यार्थिनी वयोवृद्ध महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या या सोहळ्याला गावातील सर्व नागरिकांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल शिवस्मारक समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here