आशाताई बच्छाव
जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड
प्रतिसाद : शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिल
कार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची प्रचंड
घोषणाबाजी
जालना, दि. ५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-सत्ता मिळविण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांनी
निवडणुक प्रचारात शेतकर्यांना अनेक अमिषे दाखविली. मात्र सत्ता मिळताच
शेतकर्यांना वार्यावर सोडले. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना
आठवण करुन देण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने
`क्या हुआ तेरा वादा’ हे शेतकरी जनआंदोलन सुरु केले आहे. त्याचा एक भाग
म्हणून जालना जिल्हृयातील सर्व तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकार्यांनी एकत्र येवून
जिल्हाधिकारी, तहसिलदार,ग्रामविकास अधिकार्यांना निवेदन देवून मागण्या
शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली.
आज शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात सत्ताधारी पक्षांच्या वतीने
निवडणुकीच्या काळात शेतकर्यांना कर्जमुक्ती देऊ, शेतकरी सन्मान योजनेतून
प्रति शेतकरी पपंधरा हजार रुपये देऊ, लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी
एकवीसशे रुपये मानधन देऊ, राज्यातील ४४ हजार गावात पाणंद रस्ते
बांधू,शेतकर्यांनी खरेदी केलेल्या खतावरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात परत
करू, एक रुपयात पिक विमा देऊ, वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये मानधन
देऊ, अन्नदाता बनेल ऊर्जादाता योजना राबवून शेतीला २४ तास वीज देऊ.
शेतीमालाला हमीभाव देऊ, बी बियाणे खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेऊ, हर घर
जल हर घर छत ही योजना राबवू,मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता
घेऊ अशी अनेक मोठ मोठी आश्वासने दिली. सरकार आले की आश्वासनांची पूर्तता
करण्याचा शब्द देण्यात आला होता.






