आशाताई बच्छाव
तू चाल पुढे रे गड्या तुला भीती कुणाची
भारतीय राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे सत्ता संपत्तीचा एक खेळ म्हणून भारतातील राजकारणी याकडे पाहताना दिसत आहेत
परंतु याला काही लोक अपवाद आहेत लोकसेवा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानणारे आणि करोडो रुपयांना ठोकर मारून निष्ठा म्हणजे काय हे पूर्ण महाराष्ट्राला दाखविणारे महाराष्ट्रातील एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणजेच आमच्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीनजी देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताचा हा थोडासा लेखन प्रपंच
घरात कुठलाही राजकीय वारसा नसताना आमदार नितीन देशमुख यांनी गाव पातळीपासूनच समाजसेवेच्या कामाला सुरुवात केली आणि या समाजसेवेचं फळ त्यांना त्यांच्या परिसरातील लोकांनी पंचायत समिती सदस्याच्या रूपाने जिल्हा परिषद सदस्याच्या रूपाने वेळोवेळी दिले खरंतर ही आमदार देशमुख साहेबांच्या निस्वार्थ कामाची पोच पावतीच होती
स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मानणारे आमदार देशमुख यांनी शिवसेनेची बांधिलकी जोपासत 2019 ला पक्षाने त्यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि या संधीचे सोने आमदार देशमुख यांनी केले
बाळापुर मतदार संघातून निवडून आल्यानंतर विकास कामांचा धडाका बापूंनी पूर्ण मतदार संघात राबविला
बाळापूर विधानसभा मतदारसंघात पातुर व बाळापूर दोन तालुक्यांचा समावेश असून यामध्ये विकास काम करत असताना त्यांनी कुठलाही भेदभाव केला नाही दोन्ही तालुक्यात विकास कामांचा झपाटा सुरू असतानाच कोरोना सारख्या महामारीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारची काम थोडी ठप्प पडली त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले तरीसुद्धा बापू ंना उमेद न होता मतदार संघाच्या कामांसाठी पायाला भिंगरी लावून सारखे मतदारांच्या गाठीभेटी घेत राहिले
बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढी विकास कामे कुठल्याही लोकप्रतिनिधीने केली नसून मतदारसंघातील कुठल्याही गावात जर दुःखद घटना घडली असेल किंवा कुठला व्यक्ती मयत झाला असेल तर त्याचा जात धर्म पक्ष पंथ गरीब श्रीमंत हा भेदभाव न पाहता आमदार देशमुख साहेब संबंधित परिवाराचे सांत्वन करण्यासाठी त्या त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहिले नाहीत
महाराष्ट्रात सत्तांतर होत असताना एका एका आमदाराला 50 50 कोटीचे आमिष देण्यात आले परंतु या 50 कोटी लां लाथ मारून निष्ठा म्हणजे काय हे दाखवण्याचं काम आमचे लोकप्रिय आमदार नितीन बापू देशमुख यांनी उभ्या महाराष्ट्राला दाखविले
अशा या लोकप्रतिनिधीवर पूर्ण विधानसभा मतदारसंघालाच नव्हे तर अकोला जिल्हा व पूर्ण महाराष्ट्राला आजही गर्व वाटतो आहे
आज दिनांक पाच जून हा आमदार साहेबांचा वाढदिवस या वाढदिवशी आदरणीय नितीनजी देशमुख साहेब यांना निरोगी आयुष्य जनसेवेसाठी मानसिक बळ आणि पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आई भवानी आपल्या पूर्ण इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी करतो
आपलाच :- स्वप्निलबापू देशमुख( पत्रकार)
राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ तथा भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस






