Home वाशिम महावितरणच्या २० वा वर्धापन दिवसानिमित्त्य जिल्ह्यात मोटर सायकल रॅलीतून विद्युत सुरक्षेचा जागर...

महावितरणच्या २० वा वर्धापन दिवसानिमित्त्य जिल्ह्यात मोटर सायकल रॅलीतून विद्युत सुरक्षेचा जागर चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उंदड प्रतिसाद

121

आशाताई बच्छाव

1001570800.jpg

महावितरणच्या २० वा वर्धापन दिवसानिमित्त्य

जिल्ह्यात मोटर सायकल रॅलीतून विद्युत सुरक्षेचा जागर

चित्रकला स्पर्धेला चिमुकल्यांचा उंदड प्रतिसाद

वाशीम ,दि.५ जुन २०२५ गोपाल तिवारी ब्युरो चीफ:
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महावितरणने जिल्ह्यात मोटार सायकल रॅलीचे आयोजन करून विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत चिमुकल्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उंदड प्रतिसाद दिला आहे.

मागील काही वर्षात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अपघात कमी करण्याला महावितरणला यश आले आहे.परंतू जनतेचे तसेच विशेषता लहान मुलांचे विद्युत अपघात होऊ नये यासाठी महावितरण कंपनिच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात वीज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉन – रन फॉर सेफ्टी,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, तसेच गर्दीच्या/बाजाराच्या परिसरात विद्युत सुरक्षेचा जागर करण्यात येत आहे.

विद्युत क्षेत्र हे चुकीला माफी नसलेले क्षेत्र आहे.त्यामुळे विजेचा वापर करतांना,तसेच वीज यंत्रणेच्या संपर्कापासून किंवा वीज उपकरणे वापरतांना किंवा वीज अपघात होऊच नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबाबत महावितरणकडून जिल्ह्यात जागर सुरू आहे. मोठ्या सोसायट्या,औद्योगिक संस्था याठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स तसेच प्रबोधनातून विज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

विशेषता लहान मुलांमध्ये विज सुरक्षेबाबत जनजागृची निर्माण व्हावी यासाठी अधीक्षक अभियंता अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण यांच्या पुढाकारातून आणि सर्व उपविभागीय अभियंते याच्या सहकार्याने जिल्ह्यात उपविभागनिहाय विद्युत सुरक्षेवर आधारीत निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

*वसुंधरेच्या संवर्धनासाठी’ गो ग्रीन सेवेचा पर्याय :-*

वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडावा, असे महावितरणचे आवाहन आहे. दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई – मेल द्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट महावितरणकडून दिली जात आहे. ग्राहकांनी वसुंधरेच्या संवर्धनासाठी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा.

Previous articleतू चाल पुढे रे गड्या तुला भीती कुणाची
Next articleअमरावती येथील पोलीस बापा कडून, पोटच्या मुलीवर अत्याचार: बाप लेकीच च्या नात्याला काळीमा: वर्षभरा पासुन सुरू होता अत्याचार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.