Home बुलढाणा भाजपात नवचैतन्याची लाट : मंदार बाहेकर शहराध्यक्ष, सतीश पाटील तालुकाध्यक्ष !

भाजपात नवचैतन्याची लाट : मंदार बाहेकर शहराध्यक्ष, सतीश पाटील तालुकाध्यक्ष !

86

आशाताई बच्छाव

1001566516.jpg

भाजपात नवचैतन्याची लाट : मंदार बाहेकर शहराध्यक्ष, सतीश पाटील तालुकाध्यक्ष !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यात सध्या काँग्रेस पक्षाला ग्रहण लागलेले आहे त्या ग्रहणाचा फायदा भाजपाला होत आहे भाजपच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ देत मंदार बाहेकर यांची बुलढाणा शहराध्यक्षपदी तर सतीश पाटील यांची बुलढाणा तालुका ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही दोन्ही निवडी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या ठाम नेतृत्वाखाली पार पडल्या असून, या निवडींमुळे कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट उसळली आहे. मंदार बाहेकर हे शहरातील अभ्यासू, तरुण आणि जोशपूर्ण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. दुसरीकडे, सतीश पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय आणि जनतेच्या प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणारे नेते आहेत.
या दोन्ही निवडींमुळे भाजपने शहर आणि ग्रामीण भागात सशक्त नेतृत्व दिले असून आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप आक्रमक पवित्रा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजयराज शिंदे यांच्या संघटनात्मक कौशल्यातून भाजप जिल्ह्यात अधिक बळकट होत असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अशे आहेत जिल्ह्यातील भाजपाचे पाच पदाधिकारी नियुक्त..
बुलढाणा शहराध्यक्षः मंदार बाहेकर
 बुलढाणा तालुकाध्यक्षः सतीश पाटील
 मोताळा तालुका व शहर अध्यक्ष : सचिन शेळके
 धामणगाव बढे ग्रामीण अध्यक्षः सागर पाटील
 मेहकर ग्रामीण अध्यक्षः सारंग माळी

Previous articleघृणास्पद ! ब्लॅकमेलिंग करून पाच महिने लैंगिक अत्याचार !
Next articleमुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत उभारणार दहा कोटी चे पूल आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.