Home बुलढाणा गहाळ मोबाईल शोधण्याचा ‘संग्राम!’ – चिखलीत शोध बुलढाण्यात कधी?

गहाळ मोबाईल शोधण्याचा ‘संग्राम!’ – चिखलीत शोध बुलढाण्यात कधी?

71

आशाताई बच्छाव

1001566469.jpg

गहाळ मोबाईल शोधण्याचा ‘संग्राम!’ – चिखलीत शोध बुलढाण्यात कधी?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :- बुलडाणा गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आल्याने चिखली पोलिसांची कारवाई कौतुकास्पद ठरत आहे परंतु बुलढाण्यातील गहाळ झालेले मोबाईल कधी शोधणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळापासून मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या. यावर कारवाई करत ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पथकाने 2.57 लाख रुपयांचे 21 मोबाईल हस्तगत करून मुळ मालकांना परत केले आहेत.

ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलीस अंमलदार विजय किटे, सुनिल राजपूत आणि महिला पोलीस अंमलदार रुपाली उगले यांच्या पथकाला या प्रकरणात शोधकार्यासाठी सुचना दिल्या होत्या. पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे विविध ठिकाणांवर शोधमोहीम राबवली. यामध्ये Oppo, Vivo, Samsung, OnePlus, Redmi यांसारख्या विविध कंपन्यांचे मोबाईल सापडले. सदर मोबाईल्सची एकूण किंमत 2,57,000 रुपये इतकी असून, त्यामध्ये Oppo Reno 10 (25,000/-), Vivo A3 Pro (18,000/-), आणि OnePlus Ce2 (15,000/-) अशा उच्च दर्जाच्या फोनचा समावेश आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस विभागाच्या या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बि. बि. महामुणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेमुळे चिखली पोलीसांचे काम कौतुकास्पद ठरले आहे. परंतु बुलढाण्यात शेकडो मोबाईल चोरीला गेलेले आहेत ते अद्याप पर्यंत मिळून आले नाही. त्यामुळे आमचे मोबाईल शोधून काढा असा सूर उमटत आहे.