Home सामाजिक जागतिक तंबाखू नकार दिन : 31 मे

जागतिक तंबाखू नकार दिन : 31 मे

204

आशाताई बच्छाव

1001548549.jpg

जागतिक तंबाखू नकार दिन : 31 मे

तंबाखूमध्ये निकोटिन असतो. जो तंबाखूची सवय लावणारा मुख्य घटक असतो. त्‍यामुळे तंबाखूवरील व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व वाढते. तंबाखूमध्ये निकोटिन हे विषारी रसायन असून, एक थेंबही सर्वसामान्य मनुष्याला मारू शकतो, निकोटिन व्यतिरिक्त तंबाखूमध्ये 4 हजारापेक्षा जास्त विषारी रसायने आहेत.

तंबाखू आणि कर्करोग : तंबाखूमुळे तोंड स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशयमुखाना कर्करोग होतो. तंबाखू सेवनामुळे दररोज भारतात अडीच हजार व्यक्तींचा मृत्यू होतो. तंबाखू सेवनामुळे अनेक दीर्घ कालीन शारीरिक दुष्परिणाम होतात. त्यामध्ये श्वसनासंबंधी रोग, दमा, उच्च रक्तदाब, गँगरीन, क्षयरोग, लकवा (पॅरेलिसीस), नपुंसकता, कमजोरी, जन्माला येणारे मूल कमजोर होऊ शकते, रक्तवाहिन्यांवर दुष्प्रभाव, मोतिबिंदू, फुफ्फुसांची कार्य करण्याची गती कमी होते.

तंबाखुमुक्तीसाठी मदतीचा हात :-तंबाखू सोडणे ही सोपी बाब नाही. त्यासाठी दुर्दम्य आत्मविश्वासाची गरज असते. तंबाखूपासून मुक्त होण्यासाठी स्वतः सकारात्‍मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढवायला पाहिजे.

खालील युक्त्या तंबाखू सोडण्यासाठी उपयुक्त ठरतात :-
घोषणा करा :- तंबाखू सोन्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबियासमोर, नातलगांसमोर किंवा मित्रासोबत करा.
परिहार :- अशा जागा आणि व्यक्तीपासून दूर रहा; त्या तंबाखूसेवनासाठी प्रवृत्त करतील.
कृती :- अशी सवयी जोपासा, ज्यामुळे हात व्यस्त राहतील. तंबाखूसेवनाची इच्छा होते तेव्हा 100 ते 1 अंक मोजणे तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यावर आपल्या पूर्वीच्या आनंदी क्षणांना आठवणे, पळणे, उडी मारणे, प्राणायम वगैरे व्यायाम करणे.
पाणी पिणे :- तंबाखू सेवनामु‌ळे शरीरात अस्तित्वात असणारी विषारी रसायने शरीराबाहेर टाकण्यासाठी पाणी प्यावे. तंबाखुची सेवनाने उच्च आरोग्यदायी पदार्थ सेवन करावे. मित्रासोबत आपले विचार शेअर करावेत.
• स्वत:ला फसवू नका:- मी एकदा तंबाखू सेवन केले तर काय फरक पडेल, असे विचार करून पुन्हा तंबाखू सेवनाच्या जाळ्यात अडकू नका.
औषधोपचार : जर तुम्ही वरील पद्धतीने तंबाखूची सवय सोडल्यात यशस्वी होत नसाल तर वैद्यकीय मदत घ्या.
तंबाखू सोडण्याचे फायदे : व्यक्तिगत लाभ, जीवनमानात सुधारणा, आरोग्य वृद्धी, शरीर क्षमता वृद्धी, वृध्दत्वाच्या लक्षणांमध्ये कमी, आत्मविश्वास वाढतो, पैशाची बचत होते.
कौटुंबिक लाभ: कुटुंबात आनंदी वातावरणाची निर्मिती होईल. कुटुंबातील लोकांची अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होणारी हानी थांबू शकेल, तुम्ही तुमच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी आदर्श बनू शकता.
• व्यसनमुक्तीसाठी डायल करा टोल फ्री क्रमांक : 1800-11-2356 १८००-११-२३५६ अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, ओपिडीमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
*****