Home जालना दहशतवादाप्रमाणेच भ्रष्टाचारही देशासाठी घातकच ! भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करावी-वसंतराव देशमुख राष्ट्रीय...

दहशतवादाप्रमाणेच भ्रष्टाचारही देशासाठी घातकच ! भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करावी-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस

183

आशाताई बच्छाव

1001546669.jpg

दहशतवादाप्रमाणेच भ्रष्टाचारही देशासाठी घातकच !
भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करावी-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 29/05/2025
देशाला दहशतवादी व परकिय शक्तिपासुन जसा धोका निर्माण झाला होता.त्यावर भारत सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शत्रूला धूळ चारली व दहशतवादी शत्रुचे कंबरडे मोडले असुन भारतीय सैन्य दलाने फार मोठी कामगिरी बजावली आहे.यामुळे शत्रूंची फार मोठी हानी झाली आहे.याचाच परिणाम म्हणून देशाच्या सिमेवरिल दहशतवादी कारवाया कमी झाल्या तसेच इतरही दहशतवादी कारवायांना आळा बसला असल्याचे दिसून येत आहे.
परंतु देशात दहशतवादाप्रमाणेच देशात वाढलेला कमालीचा भ्रष्टाचारही देशासाठी घातकच असुन त्यावरही भारत सरकारने कठोरातील- कठोर कारवाई करुन भ्रष्टाचारी व दोशी अधिकारी -कर्मचारी, नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कठोर शासन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे.
देशात प्रत्येक क्षेत्रात कमालीचा भ्रष्टाचार वाढला आहे.सरकारचं भ्रष्टाचारावर कोणतेच नियंत्रण नसल्याने सरकारी तिजोरीवर अनेक भ्रष्टाचारी डल्ला मारत आहेत.शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रातही कमालीचा काळा बाजार झाला आहे आणि होत आहे दररोज नवनवीन खुलासे पहावयास मिळत आहेत अशा दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.
कृषी विभागामध्येही अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले असून कोणत्याच अधिकाऱ्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.महसुल विभागातील भ्रचाराविषयी बोलण्यास शब्दच शिल्लक नाहीत.वाळुमाफीयांना अभय कोण देतं याविषयी तर सर्व जनतेलाच माहिती आहे.विशेष म्हणजे महसुलच्या काही इमानदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला जातो.यांच्या अंगावर बाळु वाहुन नेणारी वाहनं घातली जातात तर काहींना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात अशावेळी कायदा व नियम धाब्यावर का बसविले जातात.जिल्ह्याचे प्रमुख काय करतात त्यांचे हात कोणी बांधले का?हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.एकुणच शासनाच्या सर्व यंत्रणा राजकीय पक्षांच्या दावणीला बांधली गेली असल्याचे या एकुणच परिस्थितीवरु सिद्ध झाले असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. वसंतराव देशमुख यांनी म्हटले आहे.
दरदिवशी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना ओरबाडून खाण्यासाठी व त्यांचे लचके तोडण्यासाठी सर्वच शासकीय कार्यालयातील गिधाडे टपलेलीच असतात.यावरुन असे निदर्शनास आले आहे की, देशासाठी दहशतवादाप्रमाणे देशात वाढलेला कमालीचा भ्रष्टाचारही देशासाठी तितकाच घातक आहे.भ्रष्टाचाराच्या विरोधातही ऑपरेशन सिंदुर प्रमाणे ऑपरेशन भ्रष्टाचार निर्मूलन राबविण्यात योवे अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशातील भ्रष्टाचाराचा समुळ नायनाट झाला तर भारत देशाला गतवैभव प्राप्त होईल यासोबतच भारत देश हा पुन्हा “सोने कि चिडीया झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.आपण देशातील वाढलेला कमालीचा भ्रष्टाचार व यांवरील रामबाण उपाय, तसेच यावरिल उपाययोजना याविषयी लवकरच देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेणार असून त्यांना देशातील भ्रष्टाचाराविषयी माहिती देऊन या भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासुन देशाचं संरक्षण करण्यासाठी विनंती करणार असुन लवकरच यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे संपर्क साधणार व तसा पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.