Home कोल्हापूर नाचता येईना अंगण वाकडे अशा वृत्तीच्या विद्यमान आमदारांची प्रतीकात्मक जलसमाधी शिवसेना शहरप्रमुख...

नाचता येईना अंगण वाकडे अशा वृत्तीच्या विद्यमान आमदारांची प्रतीकात्मक जलसमाधी शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले यांचे अभिनव आंदोलन

992

आशाताई बच्छाव

1001546679.jpg

नाचता येईना अंगण वाकडे अशा वृत्तीच्या विद्यमान आमदारांची प्रतीकात्मक जलसमाधी
शिवसेना शहरप्रमुख रवी इंगवले यांचे अभिनव आंदोलन
कोल्हापूर (पत्रकार अविनाश शेलार यांजकडून)
कोल्हापूर शहरातील गांधी मैदान या ऐतिहासिक मैदानास पाच कोटी निधी आणला निधी मी आणला, शहराचे रस्ते मी दुरुस्त केले, गांधी मैदानात पाण्याचा निचरा संपूर्णपणे होईल, पूर नियंत्रणासाठी मी हजार आणले ; कुठेच न दिसणारे आणि फक्त अंदाज ४० कोटींचे झालेले काम म्हणताना मात्र १०० कोटींचे रस्ते अशा मोठमोठे बोलून कागदावर अधिकाऱ्यांच्या टक्केवारी सह विकास काम करणारे विद्यमान आमदार यांचे प्रतीकात्मक पुतळ्यासह जलसमाधी देण्यात आली गांधी मैदान नुकसान आम्ही केलं असं नाव न घेता बोचऱ्या टीका करणारे विद्यमान आमदार यांनी जनतेसमोर कोणती कामे केली याचा लेखाजोखा द्यावा. कोल्हापूर शहरांमध्ये रस्त्यांची त्रिधा हाल केली आहे एकच रस्ता पाच ते सहा वेळा खोदण्यात येऊन गटर्स तसेच खड्डे मुजवण्यासाठी तसेच पॅचवर्क करण्यासाठी आणि गॅस पाईपलाईन साठी रस्ता खोदण्यात आलेला आहे विशेष म्हणजे गटारा साठी रस्ता खोदला की पुन्हा तयार करायचा मग तो पिण्याच्या पाईप लाइन साठी खोदायचा. पुन्हा रस्ता केला की गॅस घरगुती गॅस पाईपलाईन साठी खोदायचा आता विचित्र खाजगी ठेकेदारांना रस्ता खुदाई सह निधी देऊन निधीची आणि रस्त्यांची विल्हेवाट लावण्यात आलेले आहेत. शंभर कोटीचे रस्ते गेले कुठे कोल्हापूरच्या भ्रष्टाचारी विकासपुरुषाच्या प्रतीकात्मक पुतळा या गांधी मैदानात जलसमाधी देण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख रविकिरण इंगवले
पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की ” या विकास पुरुषाने आजपर्यंतच्या विकासकामाचा किती बोजवारा उडाला, याचे आत्मपरीक्षण करावे. गांधी मैदानात निव्वळ टक्केवारीसाठी पाच कोटींचा निधी आणून मैदानातील पाण्याचा निचरा होईल असे दिवास्वप्न दाखवून सुरू केलेले विकासकाम पाहता या मैदानात पोहणारे बदक पाहून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे “. स्वतः निधी खर्च न करता नाचता येईना अंगण वाकडे अशी प्रवृत्ती त्यांनी अवलंबले आहे
भ्रष्टाचाराचा फोफावलेला हा तथाकथित विकासपुरुष जनतेच्या साक्षीने गांधी मैदानातील पाण्यात कायमचा विसर्जित करण्यासाठी हजारो शिवसैनिकांसह जनतेने उपस्थिती दर्शवली होती