Home बुलढाणा EXCLUSIVE – भाजपची स्वबळाची चाचपणी; बुलढाण्यातही स्वबळावर लढणार? युवक-स्त्रियांना संधी देणार भाजप?

EXCLUSIVE – भाजपची स्वबळाची चाचपणी; बुलढाण्यातही स्वबळावर लढणार? युवक-स्त्रियांना संधी देणार भाजप?

71

आशाताई बच्छाव

1001545816.jpg

EXCLUSIVE – भाजपची स्वबळाची चाचपणी; बुलढाण्यातही स्वबळावर लढणार? युवक-स्त्रियांना संधी देणार भाजप?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा महाराष्ट्रात नुकत्याच आटोपलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात भाजपच्या राज्य नेत्यांबरोबर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतील माहिती समोर येऊ लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून, याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातही भाजप स्वबळावर रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात भाजपचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून, नुकतेच निवडले गेलेले दमदार जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व सचिन देशमुख यांनी जिल्हाभरात कार्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कार्यकर्त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, युतीमुळे नव्या लोकांना संधी मिळत नाही, महिलांचे व तरुणांचे राजकारणातले प्रतिनिधित्व खुंटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भाषणांमध्ये युवक व महिलांना संधी देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा भाजपने आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केली असून, यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा बुलंद होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. आता भाजप युती टिकवते की स्वतंत्रपणे मैदानात उतरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous articleEXCLUSIVE – ‘बदल्यांचा -मौसम!’ – जिल्ह्यातील 4 पोलीस -निरीक्षकांची बदली!
Next articleराहेरी खुर्द येथील घराजवळील डीपी उचला हो साहेब करंट लागल्यास याच्यी जबाबदारी कोण घेणार, महावितरणला दिले निवेदन…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.