Home बुलढाणा असलगावात विकास नव्हे, त्रास ! ठेकेदाराचे ‘खिसे भरा, काम ठप्प’ – असलगावातील...

असलगावात विकास नव्हे, त्रास ! ठेकेदाराचे ‘खिसे भरा, काम ठप्प’ – असलगावातील रस्ता बनला घोटाळ्याचे प्रतीक !

81

आशाताई बच्छाव

1001545761.jpg

असलगावात विकास नव्हे, त्रास ! ठेकेदाराचे ‘खिसे भरा, काम ठप्प’ – असलगावातील रस्ता बनला घोटाळ्याचे प्रतीक !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-जळगाव जामोद तालुक्यातील असलगाव येथील आठवड्याच्या बाजारात दर मंगळवारी हजारो नागरिकांची गर्दी होते. संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांतील नागरिक व व्यापारी येथे येतात. मात्र, बाजार रोडवरील पुलासमोरील रस्ता गेल्या पाच महिन्यांपासून खोदलेलाच असून, काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांत प्रचंड रोष व संताप पसरला आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कसरत करत बाजारात यावे लागते. सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे मातीचे चिखलात रूपांतर झाले असून, प्रवास अत्यंत धोकादायक बनला
आहे. व्यापाऱ्यांचे व्यवहार, शेतकऱ्यांचे माल वाहतुकीचे हाल होत आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
ठेकेदार एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने कामाची अजब ढवळाढवळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. पाच महिने लोटले तरी ना रस्ता तयार, ना प्रशासनाला जाग! ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांचे ठोस दुर्लक्ष लक्षात येत असून, कोणीही जबाबदारी घेताना दिसत नाही.
गावकऱ्यांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठेचे कामकाज ठप्प झाले आहे. रस्त्यावरील अर्धवट काम आणि पुलाचा खोळंबा हे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. “आम्ही कर भरतो, पण सोयींऐवजी त्रासच मिळतो,” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रखडलेले काम त्वरित पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous articleभारतीय जनता युवामोर्चा धुळे जिल्हा यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव संपन्न…..
Next articleEXCLUSIVE – ‘बदल्यांचा -मौसम!’ – जिल्ह्यातील 4 पोलीस -निरीक्षकांची बदली!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.