आशाताई बच्छाव
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड तालुक्यात बेमोसमी अवकाळी पावसाच्या पाण्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असून जीवित हानी होऊन शेतकऱ्यांच्या अनेक जनावरे दगावलेली असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी. मुखेड तालुक्यात व परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सतत धार पाऊस सुरू आहे बेमोसमी आलेल्या पावसामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. दिनांक 27 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुखेड तालुक्यातील चांडोळा, केरूर ,होनवडज ,जांभळी, तांदळी ,बिल्लाळी ,अशा अनेक गावातील जनतेचे व शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे सध्या शेतकऱ्याचे मोसंबी पेरू उन्हाळी हायब्रीड भुईमुगाचे पीक तोंडावर आलेले असताना या बे मोसमी पावसामुळे हातात तोंडाशी आलेल्या घास हिसकावून घेण्यात आला सारखे पावसामुळे पूर्णपणे नासाडी झालेली आहे नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मोटारी शेतातील पाईप ही पुराच्या पाण्यात वाहून जाऊन खूप मोठे आर्थिक नुकसान झालेली आहे आज घडीला शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तरी मा तहसीलदार साहेबांनी सदरील पूरग्रस्त गावातील संपूर्ण शेतकऱ्याचे पंचनामे करून झालेल्या नुकसानी बदल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दूर करावे.
यावेळी उपस्थित
सचिन पाटील इंगोले
गिरीधर पाटील केरूरकर
नागेश पाटील शिंदे, वीरभद्र आप्पा स्वामी, अमोल जी मोरे, राजू पाटील दुरनाळे ,सय्यद मोहम्मद रफीक ,विनायक पाटील इंगळे ,अर्जुन सोनकांबळे आदी शेतकरी उपस्थित होते






