Home नांदेड रामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती सद्गुरु व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना

रामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती सद्गुरु व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना

87

आशाताई बच्छाव

1001542675.jpg

रामकथेसाठी सद्गुरु नराश्याम महाराज येवती सद्गुरु व यांचे शिष्यगण रामेश्वरला रवाना
——-
शुक्रवारी सुरु होणाऱ्या सप्ताहात 550 भाविकांचा सहभाग.

मुखेड प्रतिनिधी

लघु आळंदी म्हणून ख्यातकिर्त असलेल्या श्री क्षेत्र येवती (ता. मुखेड) येथील सद्गुरु नराश्याम महाराज संस्थानचा शिष्यगण बुधवारी (दि. 28) दोन जत्थ्यात रामेश्वर येथे रवाना झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दि. 30 मे रोजी रामेश्वर येथे रामकथेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, विनोद जोशी येवतीकर उर्फ बाळू महाराज रामकथास्थळी अगोदरच पोहोचले असून तेच भाविकांचे स्वागत करतील.

श्री सद्गुरु नराश्याम महाराजांचा शिष्यगण संपूर्ण महाराष्ट्रात पसरला असून वर्षात विविध प्रसंगी हे भक्तगण एकत्र येत असतात. त्यापैकी रामकथा किंवा भागवत कथा हे एक माध्यम आहे. दरवर्षी देशभरातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वतः श्री सद्गुरु नराश्याम महाराजांच्या कल्पकतेतून या कथेचे आयोजन केले जाते. यापूर्वी काशी (उत्तर प्रदेश), जगन्नाथपुरी (ओरीसा), मागील वर्षी श्रीक्षेत्र द्वारका (गुजरात) आणि यावर्षी रामेश्वर (तामिळनाडू) येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

अध्यात्माची पर्यटनाशी सुरेख सांगड घातली जात असल्याने भक्तगण सुद्धा सहकुटुंब आनंदाने सहभागी होतात. निवास व भोजन व्यवस्थेवर श्री सद्गुरु नराश्याम महाराज यांचे जातीने लक्ष असते. त्यामुळे भाविकांची कुठेही गैरसोय होत नाही. बुधवारी (दि. 28) सकाळी 8 वाजता देवगीरी या गाडीने 275 भाविक श्री हेमंत बेंडे, विशाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले. तर दुपारी 12 वाजता ओखा-रामेश्वर या गाडीने स्वतः सद्गुरु श्री नराश्याम महाराज यांच्या उपस्थितीत श्री राजेश जाधव मोकासदर, दत्तात्रय पाटील,नंदू दाचावार, महेश धुमशेटवार, चंदू सा टेंभुर्णी व्यंकट पदमवार, संतोष अण्णा महेंद्रकर, संतोष मेडेवार मुखेड, पांडुरंग पाटील, राजू कोटगिरे सावकार .यांच्या नेतृत्वाखाली 175 जणांचा दुसरा जत्था रवाना झाला. काही भाविक विमानाने तर काही भाविक स्वतःच्या नियोजनानुसार रस्ते मार्गे जाणार आहेत.

रेल्वेमध्ये फराळ व जेवणाची सोय करण्यात आली असून हे जत्थे गुरुवारी रात्रीपर्यंत रामेश्वर येथे पोहोचतील. शुक्रवारी (दि. 30) प्रसिद्ध रामकथाकार ह.भ.प श्री सुनील महाराज अष्टीकर हे रामकथेचे निरुपण करणार आहेत. या रामकथेत राज्यभरातील सुमारे 550 भाविक सहभागी झाले आहेत. रामायणातील काही दृश्य प्रसंग सुद्धा श्रीराम कथा सप्ताहात सादर केले जातात, हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरले आहे.