Home जालना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने डॉ. सुरेखाताई लहाने यांचे नगराध्यक्षपद कायम

उच्च न्यायालयाच्या निर्णयाने डॉ. सुरेखाताई लहाने यांचे नगराध्यक्षपद कायम

124

आशाताई बच्छाव

1001542623.jpg

उच्च न्यायालयाच्या निर्णयाने डॉ. सुरेखाताई लहाने यांचे नगराध्यक्षपद कायम

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायमूर्ती किशोर सी.संत यांनी डॉ.सुरेखा लहाने यांच्या रिट पीटिशन क्रमांक ५८५१/२०२५ वर अनुकूल निकाल देत त्यांना नगरपंचायत अध्यक्ष पदावर पूनरस्थापित केले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा ९ एप्रिल २०२५ रोजीचा आदेश रद्द करत डॉ. सुरेखाताई लहाने यांच्यावरील महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत अधिनियम १९६५ च्या कलम ५५ – अ आणि ५५ – ब अंतर्गतचे निलंबन रद्द केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की नियमित सभा न घेतल्यामुळे आणि काही प्रक्रियात्मक चुका झाल्यामुळे अपराधी आचरण किंवा लज्जास्पद वर्तन ठरत नाही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण
न्यायमूर्ती किशोर सी.संत यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे की निवडून आलेल्या व्यक्तींना पदावरून हटवणे हा गंभीर विषय आहे. केवळ प्रक्रियात्मक उल्लंघनामुळे अपकृत्य ठरत नाही. जाणुन बुजुन चुकीचे वर्तन किंवा व्यक्तिगत फायदा दाखवणे आवश्यक
कलम ८१ आणि ५१- अ मध्ये अशी तरतूद नाही की त्याचे उल्हंगण झाल्यास अपात्र ठरते असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.३० मे रोजी नियोजित अध्यक्ष पदासाठीची निवडणूक आता रद्द झाली आहे. डॉ. सूरेखाताई लहाने त्यांच्या अधिकृत कर्तव्यात परत येतील आणि नगरपंचायतीचे कामकाज नियमित सुरू होईल.
तसेच न्यायालयाच्या निकालाची बातमी मिळताच जाफराबाद शहरातील डॉ. सुरेखाताई संजयजी लहाने यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सुरेखाताई लहाने, उपनगराध्यक्ष दामोधर वैद्य, फइमखान पठाण, शेख सउद , रघुनाथ पंडित, संजय जी लहाने सर, परसराम ढाले, शेख रउफ चेअरमन,फारेस चाऊस, मुझाहेद मिर्झा , तालेब पठाण, शेख आवेज इत्यादी उपस्थीत होते.