Home जालना सलग तीन महिने ऑनलाइन बिल पेमेंट करणाऱ्या ग्राहकास लकी ड्रॉ तर्फे स्मार्ट...

सलग तीन महिने ऑनलाइन बिल पेमेंट करणाऱ्या ग्राहकास लकी ड्रॉ तर्फे स्मार्ट वॉच व मोबाईल चे वाटप

200

आशाताई बच्छाव

1001542598.jpg

सलग तीन महिने ऑनलाइन बिल पेमेंट करणाऱ्या ग्राहकास लकी ड्रॉ तर्फे स्मार्ट वॉच व मोबाईल चे वाटप
युवा मराठा प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन महावितरण कंपनीतर्फे घरगुती मीटर धारकास बिल भरताना ऑनलाईन पद्धतीने बिल पे करता यावी म्हणून महावितरण तर्फे लक्की ड्रॉ पद्धत ठेवण्यात आली आहे जे ग्राहक थकीत न राहता सलग्न तीन महिने ऑनलाईन पद्धतीने बिल भरेल त्यांच्यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने ड्रा काढल्या जात आहेत व त्यामध्ये ज्या ग्राहकास मोबाईल किंवा स्मार्ट वॉच निघत असेल त्यांना महावितरण तर्फे बक्षिसाचे वाटप केल्या जात आहे सलग्न तीन महिने लाईट बिल ऑनलाईन भरणारे ग्राहक ईश्वर रामलाल पांढरे यांना स्मार्टवॉच चे बक्षीस देताना महावितरणचे कार्यकारी अभियंता शरद चेचर साहेब व सहाय्यक लेखापाल रवींद्र राठोड साहेब व बक्षीस स्वीकारताना ईश्वर रामलाल पांढरे प्रत्येक विज बिल ग्राहकाने विज बिल भरणा करताना ऑनलाइन पद्धतीने घरी बसून विज बिल भरून या ड्रॉमध्ये सहभागी व्हावे व बक्षीस मिळवावे व महावितरण कार्यालयास सहकार्य करावे असे आव्हान कार्यकारी अभियंता शरद चेचर व रवींद्र राठोड साहेब यांनी केले या अगोदर विज बिल भरणा करताना बऱ्याचशा अडचणी सामना नागरिकांना करावा लागत होता बँकेत लाईन मध्ये उभे राहून ताटकळत बसावे लागत असे त्यानंतर विज बिल भरणा करावा लागत होता त्यामुळे बरसे नागरिक भरणा न करता थकीत राहत होते परंतु आता ऑनलाइन पद्धतीने भरणा करता येतो हे या माध्यमातून नागरिकांना महावितरण तर्फे पटवून देण्यात येत आहे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून विज बिल धारकांनी घरी बसून ऑनलाइन पद्धतीने विज बिल भरणा करावा ऑनलाईन पद्धतीने बिल भरणा करून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे असे आव्हान कार्यकारी अभियंता शरद चेचर साहेब यांनी केले आहे .

Previous articleभोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेंद्रजी साबळे यांनी पदभार स्वीकारताच सामान्य नागरिकांच्या कामांना वेग
Next articleउच्च न्यायालयाच्या निर्णयाने डॉ. सुरेखाताई लहाने यांचे नगराध्यक्षपद कायम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.