Home भंडारा तळपत्या सूर्याच्या वादळाच्यासावलीने 27मे ला जगाचानिरोप घेतला

तळपत्या सूर्याच्या वादळाच्यासावलीने 27मे ला जगाचानिरोप घेतला

119

आशाताई बच्छाव

1001541509.jpg

तळपत्या सूर्याच्या वादळाच्यासावलीने 27मे ला जगाचानिरोप घेतला

पंचायत समिती सभापती अश्विनी मोहतुरे

संजीव भांबोरे
भंडारा -वादळाची सावली ,बाबासाहेबांची रामू ,शेणाच्या गोवऱ्या थापून अपार कष्ट सहन करून संसार करणारी ,अठरविश्व दारिद्रय, नऊकोटी लेकरांची माय निरोप घेण्यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हात आपल्या थरथरत्या हातात घेऊन साहेब माझे चार लेकरं रमेश, गंगाधर
राजरत्न, इंदू गेली परंतु आता
माझ्या नऊ कोटी लेकरांवर लक्ष ठेवा त्यांची काळजी घ्या त्यांना हक्क, अधिकार, मान सन्मान, स्वाभिमान जरूर मिळवून द्या असे म्हणून दलित , पीडित ,शोषित,वंचित, सर्वहारा, समाजाचे जग पार अंधारात कायमस्वरूपी बुडाले तेव्हा बाबासाहेब ढसाढसा रडले
आणि तळपत्या सूर्याच्या सावलीने या जगाचा कायमचा निरोप सत्तावीस मे 1935 रोजी घेतला असे प्रतिपादन महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये रमाई स्मृतिदिनानिमित्त पंचायत समितीच्या सभापती अश्विनी मोहतुरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमान कानेकर यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनामध्ये रमाई खंबीरपणे उभी होती. तद्ववतच परदेशात पत्र पाठवून सांगायची की साहेब तुम्ही इकडची चिंता करू नका मी पूर्णतः सांभाळीते केवढा महान त्याग आहे रमार्ईचा? विद्या डोंगरे यांनी सांगितले की रमाई जीवनाचे पैलू उलघडले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना डोंगरे आणि आभार साधना शिंगाडे यांनी मानले .या कार्यक्रमात सहभागी डॉ सुरेश खोब्रागडे, गजेंद्र गजभिये, डॉ रेवाराम खोब्रागडे ,रमेश भोयर, युवराज भालाधरे, किशोर बन्सोड, डॉ बाळकृष्ण रामटेके , रामप्रसाद देशपांडे ,हर्षवर्धन तागडे,कमल गणवीर, वर्षा तिरपुडे, प्रमिला इलमकर सरिता कानेकर,, उपस्थित होते.

Previous articleआरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : डॉ. शेटे
Next articleयुवकांनी साकारला “आठवणींच पान” लघुचित्रपट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.