आशाताई बच्छाव
वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवा; पालकमंत्र्यांच्या सूचना
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकमेकांमधील समन्वय व सहकार्याने पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अशोक सावंत महाराज आदी उपस्थित होते.






