Home मराठवाडा लातूर जवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

लातूर जवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

109

आशाताई बच्छाव

1001535778.jpg

लातूर जवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू
बालासाहेब शिंदे लातूर जिल्हा प्रतिनिधी
लातूर – औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ कार उलटून झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. हा अपघात आज दुपारी ४. १९ वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. देशमुख हे माजलगाव मतदारसंघात २०१४ ते २०१९ साली आमदार होते.
माजलगावचे माजी आ. आर. टी. देशमुख हे आपल्या कारने ( क्र. एमएच ४४ एडी २७९७) तुळजापूरमार्गे लातूरकडे येत होते. दुपारी ४:१९ वाजता बेलकुंडनजीक असलेल्या उड्डाणपुलावरून काही अंतरावर कार पुढे आल्यावर रस्त्यावर साचलेले पाणी कारच्या काचेवर पडले. त्यामुळे चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला. बाजूस असलेल्या रस्त्याच्या कठड्याला कार जोरात धडकली. अपघातात कार चारवेळा पलटी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यात कारचालक व सोबत असलेले माजी आ. आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही रुग्णवाहिकेतून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, रस्त्यातच माजी आ. आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला. चालकावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.
जिजा म्हणून होते परिचित
जिजा म्हणून सर्वत्र परिचित असलेले आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
गाडीने उड्डाणपुलाच्या दुभाजकाचे कठडे तोडले
चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर चारचाकी रस्त्याच्या बाजूला उलटली. गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्याची माहिती आहे. गाडीतील चालक आणि माजी आमदार देशमुख दोघेही गंभीर जखमी झाले. जवळच असलेल्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. पोलिस आणि इतर वाहनधारकांनी गंभीर जखमी दोघांना गाडीतून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Previous articleवारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवा; पालकमंत्र्यांच्या सूचना
Next articleगडचिरोलीत वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.