Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

116

आशाताई बच्छाव

1001535723.jpg

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यात २६ ते २८ मे २०२५ दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलोअलर्टही जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
भीमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleशेतकऱ्याला तात्काळ कर्जमुक्त करा विदर्भवादी शेतकरी संघटनेमार्फत जिल्हाधिकारी , प्रधानमंत्री ,मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना निवेदन
Next articleवारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवा; पालकमंत्र्यांच्या सूचना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.