आशाताई बच्छाव
21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
जालना दि.16 (जिमाका): नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे दि. 21 मे, 2025 बुधवार रोजी “प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधी”चे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यासाठी टी.व्ही.एस. सप्लाय चैन सोल्युशन्स प्रा. लि. पुणे दहावी, बारावी, आयटीआय/पदवीधर बी.ए, बी.कॉम, बी.एसी उत्तीर्ण करिता फ्लोअर स्टाफ चे 50 पदे, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी कोपा,आयटीआय / MS-CIT कॉम्पुटर ऑपरेटर उत्तीर्ण करिता 10 पदे, टो ऑपरेटर करिता डीझेल मेकेनिकॅल, ट्रक्टर मेकेनिकॅल, मोटार मेकेनिकॅल उत्तीर्ण करिता 50 पदे, तसेच अन्नपूर्णा फायनन्स प्रा.लि. जालना यांची दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण करिता फील्ड क्रेडीट एक्झीकेटीव्हसाठीचे 20 पदे, मार्केटींग एक्झीकेटीव्ह करिता कोणतीही पदवी उत्तीर्णकरिता 20 पदे, अशी एकूण 120 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.असे कळविण्यात आले आहे.






