आशाताई बच्छाव
रात्रीच्या वेळी रिंगरोडवर लुटमार करणारे दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी केली अटक
जाफराबाद जालना
प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक ०३/०५/२०२५ रोजी पांडुरंग कोल्हे रा. नवीन मोंढा गोकुळ नगर यांनी पोलीस ठाणे चंदनझुरा येथे तक्रार दिली होती की, ते MIDC येथून रात्रीच्या वेळी घरी जात असताना हॉटेल कनक पॅलेस समोरील रिंगरोडवर तीन अज्ञात आरोपीने अडवून मारहाण करून धमकावून जबरदस्तीने त्यांची मोटरसायकल अन्य मुद्देमाल हिसकावून नेला होता. सदर गुन्हा उघडकीस आण्याकरिता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी एक पथक तयार करून सदर पथकाने आरोपी नामे १) अनिकेत अनिल तुपे वय २५ वर्ष राहणार नूतन वसाहत जालना २) दीपक साबळे व १९ वर्ष राहणार नूतन वसाहत जालना यांना जालना शहरातून ताब्यात घेऊन माननीय न्यायालयत हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना १६/०५/२०२५ पर्यंतचा पोलीस कस्टडी दिली आहे.त्यांच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन HF डीलक्स मोटरसायकल जप्त केली आहे. सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता या दोन आरोपी व त्यांचा एक फरार सहकारी आरोपीने मिळून दिनांक ०२/०४/२०२५ रोजी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मंठा रोडवरील चौधरी नगर भागात आईस्क्रीम गाडी चालकास धमकावून त्याचेही पैसे कुटल्याचे कबुली दिली आहे. सदर आरोपी क्र.०१ विरुद्ध लुटमार व दरोड्याचे गुन्हे दाखल आहे. सदर आरोपी यांच्याकडून इतर लुटमारीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदर कामगिरी श्री .आयुष नोपानी, प्रभारी पोलिस अधीक्षक जालना श्री.अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सम्राटसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात श्री. सुशील चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.विठ्ठल शिंदे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोहेकॉ. कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस ,अशोक जाधव, राजू पवार ,दीपक डेंगळ, चालक संग्रामसिंग ठाकूर स्थानिक गुन्हे शाखा चे सागर बाविस्कर यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.






