Home उतर महाराष्ट्र पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी बुडून मृत्यू.

पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी बुडून मृत्यू.

139

आशाताई बच्छाव

1001506779.jpg

राहाता/गोगलगाव दिपक कदम तालुका प्रतिनिधी : पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी बुडून मृत्यू.

राहाता तालुक्यातील गोगलगाव मध्ये म्हसोबा वस्ती येथील डागतलावात दिनांक दि.14 मे 2025 रोजी दुपारी 1 च्या सुमारास
साहिल दत्तात्रय चौधरी वयवर्ष 17 आणि किरण नारायण चौधरी वयवर्ष 14
या दोन सख्ख्या चुलत भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गोगलगाव व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

दत्तात्रय चौधरी आणि नारायण चौधरी हे दोघेही भाऊ हे म्हसोबा वस्ती या ठिकाणी शेतात राहतात. या शेताशेजारीच पाझर तलाव आहे. दिनांक 14 मे रोजी चौधरी कुटुंब हे शेतामध्ये शेणखत टाकत होते. शेणखत टाकून झाल्यानंतर हे घरी गेले. मात्र साहिल दत्तात्रय चौधरी आणि किरण नारायण चौधरी
हे दोघेजण शेताच्या बाजूला असलेला पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धूत असताना साहिल याचा पाय घसरला आणि तो खड्ड्यात पडला. त्याला धरण्यासाठी किरण गेला असता तो पण पाण्यात सटकला. पाण्याची खोली जास्त असल्यामुळे दोघेही बुडाले. त्यानंतर त्यांना तेथील एका महिलेने बुडत असल्याचे पाहिले असता आरडाओरडा केला. आरडाओरड चालू असल्याने आसपासचे नागरिक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. आणि दोघांना बाहेर काढून उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आले. परंतु तेथे या
या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यांना अंत्यविधीसाठी गोगलगाव येथे आणण्यात आले . दोघांचेही अंत्यसंस्कार हे गोगलगाव अमरधाम या ठिकाणी केले. चौधरी कुटुंबावर हा दुःखाच्या डोंगर कोसळला असून दत्तात्रय चौधरी आणि नारायण चौधरी या दोघांनाही एक मुलगा अणि एक मुलगी आहे . या दोघांच्याही मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यू मुळे गोगालगाव मधील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

Previous articleब्राईट स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश, गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम
Next articleतेरा कोटी पंच्याहत्तर लाख, एकेचाळीस हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.