आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 99.24%
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सेमी इंग्रजी वर्गातील 79 पैकी 79 विद्यार्थी उत्तीर्ण सेमी इंग्रजी वर्गाचा निकाल शंभर टक्के. प्रथम क्रमांक कुमारी ऋतुजा शालीक शिंदे 95.60%, द्वितीय क्रमांक कुमारी समीक्षा विजय बनकर 94.40%, तृतीय क्रमांक कुमारी आर्या संतोष परकाळे 91.80% ,कुमारी कल्याणी गणेश सावडे 91.80%.
इयत्ता दहावी मराठी माध्यम प्रथम क्रमांक साक्षी ज्ञानेश्वर गव्हाणे 87.60%, द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी संतोष बनकर 86%, तृतीय
क्रमांक साक्षी राजू मस्के 84.40%,
दोन्ही वर्ग मिळून 131 पैकी 130 विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक विद्यार्थी एटी-केटी मध्ये पात्र आहे शाळेच्या उज्वल निकालाबद्दल पंचक्रोशीतील नागरिकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षकांचे अभिनंदन केले आहे संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरराव ढवळे, सचिव प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब ढवळे यांनी उत्तीर्ण विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी व प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.






