Home जालना तोंडोळी व गाडेगव्हाण गट ग्रामपंचायत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

तोंडोळी व गाडेगव्हाण गट ग्रामपंचायत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

146

आशाताई बच्छाव

1001501883.jpg

तोंडोळी व गाडेगव्हाण गट ग्रामपंचायत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर

जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके

दिनांक 14/05/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक 06/05/2025 रोजी गट ग्रामपंचायत तोंडोळी /गाडेगव्हाण येथे मा. सरपंच सौ. अनिता ज्ञानेश्वर बनकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वसूचित केल्याप्रमाणे ग्रामपंचायत तोंडोळी /गाडेगव्हाण ची ग्रामसभा सकाळी ठीक 9:30 वाजता गाडेगव्हाण येथील मारुती मंदिरासमोर घेण्यात आली. या ग्रामसभेत काही ठराव संमत करण्यात आले.
त्यामध्ये प्रामुख्याने मौजे गाडेगव्हाण तालुका जाफराबाद येथील विनापरवानगी व अवैधरित्या दारू विक्री कायमची बंद करण्याबाबतचा ठराव घेण्यात आला. यावेळी सूचक म्हणून श्री दीपकराव गंगाधर बनकर यांनी तर अनुमोदक म्हणून श्री ज्ञानेश्वर सिताराम बनकर यांनी याविषयी सुचविले. श्री दीपक बनकर यांनी यावेळी सांगितले की,मौजे गाडेगव्हाण येथे अनेक दिवसापासून अवैध व विनापरवानगी १)संजय आसाराम सावंत आणि २)कडूबा हिवाळे हे दोघे दारू विक्री करतात त्यामुळे गावातील महिला, लहान मुले, मुली, यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्याचा मानसिक त्रास सर्वच समाज घटकातील नागरिकांना होत असून वाईट संस्कार पडत आहेत .गावात भांडणे, हाणामारी, चोऱ्या, दादागिरी यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना असुरक्षित असल्याचे वाटत आहे.त्यासाठी या सर्व प्रकारापासून नागरिकांना मुक्ती पाहिजे असल्याकारणाने गाडेगव्हाण येथील महिलांनी दारू दुकान बंद करण्यात यावे म्हणून ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन/ अर्ज सादर केलेले आहेत. महिला व गावकरी यांनी ग्रामसभेत सांगितले आहे की, अनेक दिवसापासून अवैध पद्धतीने होणारी दारू विक्री कायमची बंद करण्यात यावी असे सुचविले.
यावर सभेत सविस्तर व साधक- बाधक चर्चा करून सर्व गावकऱ्यांच्या संमतीने या ग्रामसभेमध्ये गाडेगव्हाण येथील दारू कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तशा आशियाचे लेखी निवेदन पोलीस अधीक्षक जालना तसेच पोलीस स्टेशन टेंभुर्णी यांना देण्यात आले आहे.
या ठरावावर अनेक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दीपक गंगाधर बनकर, ज्ञानेश्वर सिताराम बनकर, संतोष बनकर, विकास नानाभाऊ सावंत, कैलास गुलाब गीरी, संजय पांडुरंग देठे, गुलाब, बनकर,दत्तू बनकर, विठ्ठल भगवान कापसे, विष्णू शेरकर, विजय बनकर, विठ्ठल सुखदेव दाभाडे,उत्तमराव कौतिकराव सावंत, रतन सावंत, समाधान श्रीराम बनकर, रावसाहेब बालाजी बनकर,माधव कौतिक देठे, गंगुबाई दिलीप बनकर, शिंदुबाई रामदास, सुमनबाई भीमराव, मंगला संतोष बनकर, द्वारकाबाई कडूबा हिवाळे, सागर परमेश्वर देठे, नंदा हिवाळे, गयाबाई सुभाष बनकर, कल्पना संदिप, रुखमन नंदू बनकर, नंदा विष्णू बनकर, पर्वताबाई साहेबराव देठे, उमेश गुलाबराव बनकर, कृष्णा फाकिरबा सांगळे, नंदू गंभीरराव बनकर, अनिल कडुबा कानडे, भानुदास बाबुराव बनकर,अवचितराव संतोष बनकर, रामधन बनकर, गणेश कानडे, भाऊसाहेब बालाजी बनकर, भाऊसाहेब देठे, सुमनबाई भीमराव घो, शिंदूबाई रामदास घोरपडे, गंगुबाई दिलीप बनकर, शोभा मनोहर खरात, सवित्राबई गंभीर बनकर, माल्हणबाई गणेश बनकर, निर्मला विठ्ठल दाभाडे,पदमाबाई भाऊसाहेब बनकर. या गावकऱ्यांच्या ठरावावर सह्या आहेत