Home जालना भाजपाच्या जालना महानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी श्री.भास्कर आबा दानवे यांची निवड होताच फटाके...

भाजपाच्या जालना महानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी श्री.भास्कर आबा दानवे यांची निवड होताच फटाके फोडून जल्लोष

112

आशाताई बच्छाव

1001501899.jpg

 

भाजपाच्या जालना महानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी श्री.भास्कर आबा दानवे यांची निवड होताच फटाके फोडून जल्लोष

चांगले काम करण्याचा व सर्वांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न

– नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षपदांची घोषणा पक्षाचे निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी नुकतीच केली आहे. भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या खांद्यावर जालना महानगर जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले व माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे, आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे यांनी अभिनंदन केले आहे.

पक्षाच्या निरीक्षकांनी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यापैकी प्रत्येक उमेदवाराला पसंती क्रमानुसार मते देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. भास्कर आबा दानवे यांचा प्रदीर्घ संघर्ष लक्षात घेता हे महत्त्वाचे पद ठरणार आहे. हि निवड पक्षामार्फत जाहीर होताच भाजपा जालना महानगराच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

 

भास्कर आबा दानवे यांनी माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तसेच जालना विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे व चांगले काम करून दाखवले. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

Previous articleतोंडोळी व गाडेगव्हाण गट ग्रामपंचायत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर
Next articleदहावी परीक्षेत रोहित जाधव याचे यश  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.