Home भंडारा गरिमा भूषण थुलकर अड्याळ विद्यालय अड्याळ येथून प्राविण्य सूचित

गरिमा भूषण थुलकर अड्याळ विद्यालय अड्याळ येथून प्राविण्य सूचित

467

आशाताई बच्छाव

1001500584.jpg

गरिमा भूषण थुलकर अड्याळ विद्यालय अड्याळ येथून प्राविण्य सूचित

पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्षात घरी भेट देऊन तिचे केले अभिनंदन

प्रामाणिक अभ्यास केल्यास यस निश्चित-बारावीनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याची इच्छा

संजीव भांबोरे
भंडारा- पवनी तालुक्यातील अड्याळ येथील अड्याळ विद्यालय अड्याळ विद्यालयाची विद्यार्थिनी घरची परिस्थिती सर्वसाधारण असताना कुमारी गरिमा भूषण थुलकर या विद्यार्थिनीने
अड्याळ विद्यालयातून मुलींमधून 92.60% गुण घेऊन शाळेतून मुलींमधून प्रथम व शाळेतून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली .आज दिनांक 13 मे 2025 ला सायंकाळी 5 वाजता मुलीचे अभिनंदन करण्याकरता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांनी घरी प्रत्यक्ष घरी भेट देऊन अभिनंदन केले. व पुढील उज्वल भविष्याकरता तिला शुभेच्छा दिल्या. याबाबत विद्यार्थिनी कुमारी गरिमा यांच्यासोबत
चर्चा केली असता मी सतत 8 तास अभ्यास करीत असल्याचे तिने यावेळी सदर प्रतिनिधी बोलताना सांगितले. पहाटेला चार वाजे उठल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत अभ्यासाकडे सतत लक्ष देत असल्याने मला हे यश मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मला अकरावी सायन्स घेण्याची इच्छा असून समोर काय बनण्याची इच्छा आहे यावर प्रश्न उपस्थित केला असता बारावीनंतर अशाच प्रकारचे यश संपादन करून सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याची इच्छा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे मोठे वडील अमोल थुलकर, मोठी आई समीना थुलकर, भाऊ अंकित थुलकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिंदखेडा येथे मुंडण आंदोलन. (घेतला एका निष्पाप मुलाचा जीव
Next articleसावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.