Home पुणे मनसे शहराध्यक्षपदाला ७ वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार

मनसे शहराध्यक्षपदाला ७ वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार

93

आशाताई बच्छाव

1001500508.jpg

पुणे राकेश बेहरे पाटील प्रतिनिधी- मनसे शहराध्यक्षपदाला ७ वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जनतेचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, झपाट्याने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या मनसे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आमच्यावर सोपवली. या सात वर्षांच्या कार्यकाळात पक्ष तसेच जनता जनार्दनाचा आमच्यावर असलेला विश्वास आणि त्यांच्या प्रेमामुळे आम्हाला महापालिकेत ‘नगरसेवक, मनसे शहराध्यक्ष, स्मार्ट सिटी संचालक, गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही संधी माझ्यासाठी केवळ सन्मानाची नाही, तर जबाबदारीचीही होती.यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध घटकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला. “हे सात वर्षे म्हणजे संघर्ष, सेवा आणि समाजाभिमुख कामगिरीची साक्ष आहेत,” असे सांगत त्यांनी विशेषतः शेतकरी, कामगार, युवक, महिलांसाठी उभे केलेली आंदोलने आणि उपक्रम यांची आठवण करून दिली. ते पुढे म्हणतात की, तुमच्या विश्वासामुळे, अथक मेहनतीमुळे, आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच आज आपण कार्यरत आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने दिवस-रात्र एक करून ही चळवळ उभी केली आहे. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आगामी काळातही आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहोत.”
दरम्यान, “ही सात वर्षे म्हणजे केवळ प्रशासनाची जबाबदारी नव्हे, तर जनतेच्या सेवेत समर्पित असलेला एक प्रवास होता. या काळात मला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी मनसेचा, सर्व नागरिकांचा, सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे. “जनतेच्या विश्वासास पात्र ठरणे हीच माझी खरी ताकद असून, येणाऱ्या काळात अधिक जोमाने विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार मी व्यक्त करतो.” ही लढाई आता जबाबदारीत रूपांतरित झाली आहे. आम्ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर जनतेच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी काम करत आहोत. पारदर्शकता, विकास आणि लोककल्याण हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. हीच झुंजार वृत्ती पुढील काळातही कायम ठेवून, तुमच्या प्रत्येक हक्कासाठी मी झगडत राहीन. असे सचिन चिखले यांनी प्रसिद्धीस दिलेला निवेदनात म्हटले आहे.

Previous articleपिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड
Next articleडिपॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( S.S.C.)परीक्षेचा निकाल 100%
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.