Home भंडारा ध्यान गौशाळेतील तीघांवर कोर्टाचा अपमान प्रकरणी गुन्हा दाखल

ध्यान गौशाळेतील तीघांवर कोर्टाचा अपमान प्रकरणी गुन्हा दाखल

338

आशाताई बच्छाव

1001497186.jpg

ध्यान गौशाळेतील तीघांवर कोर्टाचा अपमान प्रकरणी गुन्हा दाखल

ध्यान फाऊंडेशन गौशाळेचे पितळ उघडे पडणार.? परीसरात मृतक जनावरांची हाडे सापडली ; व्हिडिओ झाला प्राप्त

कोर्ट आदेशाची अवहेलना प्रकरणी दाखल झाला होता लाखनीत गुन्हा ,

आदेश असूनही जनावरे देत नाही , आ. पटोले व आ. फुके यांकडेही गेले प्रकरण

 

संजीव भांबोरे
भंडारा _नुकतेच “ध्यान फाऊंडेशन गौशाळा” गराडा तह. लाखनी यांनी न्यायालयाचा आदेश असतानाही साकोलीच्या शेतकऱ्यांना त्यांचे ३५ बैल देण्यास का नकार दिला.? यावर शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता. पण आता मात्र याच ध्यान गौशाळेतील तीन जणांवर लाखनी पोलीस ठाणे येथे न्यायालयाची अवहेलना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले. या संतापजनक प्रकरणी सखोल चौकशी केल्यास फार मोठे षडयंत्र उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सदर शेतकऱ्यांना गौशाळा चालकांचे दूरध्वनी जाऊन “पत्रकार” यांना माहिती देऊ नका अन्यथा बैल परत मिळणार नाही असा दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे त्या शेतकऱ्यांतर्फे पुढे आले आहे.
साकोली तालुक्यातील १५ शेतकरी २६ मार्च २०२५ ला गोरेगाव ( गोंदिया ) येथून बैल बाजार समितीची पावतीसह येत असता डुग्गीपार पोलीसांनी प्रकरण दाखल करून बैल ध्यान फाऊंडेशन गौशाळा गराडा ( लाखनी ) येथे पाठविले. तसेच ११ एप्रिलला दिवाळी न्यायालय सडक अर्जुनी येथून बैल परत करा असा आदेश दिला. तरीसुद्धा शेतकऱ्यांना बैल परत मिळाले नाही. यावर साकोलीत ०७ मे २०२५ ला त्या शेतकऱ्यांनी “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” ची पत्रकार परिषद घेऊन आमची बैल जिवंत आहेत का.? की कत्तलखाना येथे विकली.? असा आरोप केला होता. कारण न्यायालयाने आदेश दिला असतांना बैल का परत मिळत नाही यावर संशय व्यक्त केला होता. दि. १६/०२/२०२४ ला या गौशाळेतील तीन जण नमूद ठिकाणी यातील फिर्यादी स. फौ. कंठीलाल सदाशिव धारणे रा. गोरेगाव यांनी मा. जेएमएफसी सा. कोर्ट ४ चे गोदिया यांचे लेखी आदेशाने पो स्टे गोरेगाव अप. क्र ३७/२४ कलम ११ (१) (ड) प्राण्याचा छळ प्रतीबंधक अधि, सह ५, ६, ९ महा पशू संरक्षण अधि १९७६ गुन्यातील चार पांढ-या रंगाचे बैल सुपुर्तनाम्यावर सोडण्याबाबद आदेशाची प्रत ध्यान फाऊंडेशन गौशाळा बरडकिन्ही यांना दिले असता, यातील आरोपींधी बैलांची फिटनेस सर्टीफिकेट द्या तसेच डॉक्टरांना घेवुन या असे बोलुन संगनमत करुन फिर्यादी यांना रात्री पर्यत बसवुन बैल देण्यास टाळाटाळ करुन मा. कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली असे फिर्यादीचे लेखी रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. व न्यायालयाची अवहेलना प्रकरणी कलम भादंवि १८८, ३४ नुसार आरोपी संदीप विकास कुथे ३२ वर्ष, किशोर जयदेव ठवकर ३१ वर्ष दोन्ही रा. रेंगेपार/कोहळी ता. लाखनी व विकास पांडुरंग पडोळे ३४ वर्ष रा. मुरमाडी/लाखनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता मात्र सदर ध्यान फाऊंडेशन गौशाळा बरडकिन्ही यांच्या स्थापनेपासून यांच्याकडे आतापर्यंत भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील किती गुन्ह्यात किती जनावरे आलीत.? त्यांची आजची परिस्थिती काय.? किती मरण पावली.? किती शिल्लक आहेत.? याचा सविस्तर अहवाल मा. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी माहिती घेऊन तशी कारवाई करण्यात का येऊ नये. सदर ध्यान गौशाळा सर्वप्रथम बरडकिन्ही येथे होते. त्यानंतर लाखनीतील गराडा येथे स्थानांतरण केले यावर कुणाची परवानगी घेण्यात आली.? सदर स्थानांतरण “ॲनिमल वेल्फेअर बोर्ड दिल्ली” यांच्या परवानगीने झाले आहे. व सध्या स्थितीत भंडारा जिल्ह्यात दोन गौशाळा समित्या आहेत त्या कुणाच्या जागेवर आहेत याची सुद्धा संशयास्पद आहे. तसेच ध्यान फाऊंडेशन गौशाळा यांचे रजिस्ट्रेशन “ॲनिमल वेल्फेअर बोर्ड” दिल्ली यांकडून असून ते कोणकोणत्या राज्यात लागू आहे.? या सर्व प्रकरणांची जर सखोल चौकशी केली तर फार मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे. असा अंदाज आता प्रत्येक गौपालक जनता लावित आहेत. नुकतेच ०७ मे २०२५ रोजी शेतकऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून काल सोम. १२ मे रोजी ध्यान फाऊंडेशन गौशाळा येथून काहींचा त्या शेतकऱ्यांना फोन गेला व पुन्हा पत्रकारांना माहिती दिली किंवा पुन्हा पत्रकार परिषद घेतली तर तुमची जनावरे मिळणार नाही, जनावरे पाहिजे असतील तर पत्रकारांना माहिती देणे बंद करा असे दबावतंत्राचा वापर शेतकऱ्यांना केला आहे. यायाच अर्थ असा की, सदर ध्यान फाऊंडेशन गौशाळा बरडकिन्ही व गराडा येथे आतापर्यंत किती बैल व इत्यादी जनावरांची आवक झाली आणि यांचा अहवाल पारदर्शकता ठेवून तपासात घेतला तर “जनावरे देण्यास टाळाटाळ का” या संशयाच्या भोवऱ्यात फार मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता शेतकरी जनतेने वर्तवली आहे. व यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आता जनतेतून जोर धरत आहे.