आशाताई बच्छाव
…अखेर शेतकऱ्यांच्या “त्या” पत्रकार परिषदेची घेतली आमदार नाना पटोले यांनी दखल
आ. परीणय फुके यांकडेही गेले हे संतप्त प्रकरण
: शेतकऱ्यांनी साकोलीत “महाराष्ट्र शासन मा. प्रा. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” ची घेतली होती पत्रकार परिषद •
संजीव भांबोरे
भंडारा-साकोली :गोरेगाव ( गोंदिया ) येथून रितसर बैल खरेदी करीत बाजार समितीची पावती सोबत घेऊन पायदळी येत असलेल्या ३५ बैलांना डुग्गीपार पोलीसांनी अडवून ठाण्यात आणले. रात्रभर विना चा-या पाण्याने ठेवून दूस-या दिवशी गौशाळेत रवाना केले. शेतकऱ्यांनी सविस्तर न्यायालयातून बैल परत करा असा आदेश देऊनही गौशाळा मालक शेतकऱ्यांना बैल देण्यास टाळाटाळ केली होती. एक महिना लोटला व या संतापजनक प्रकारावर शेतकऱ्यांनी साकोली येथे ( बुध. ०७ मे ) ला “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” तर्फे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. आरोप केला की, सर्व आमचे बैल परत करावेत अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वृत्त विविध वृत्तपत्रांत झळकले होते. आणि याची तातडीने दखल साकोली आमदार नाना पटोले यांनी घेतली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व संबंधित शेतकऱ्यांचे बैल परत न करणारे गराडा गौशाळा संचालकांना पोलीस ठाणे डुग्गीपार येथे चर्चा करीता बोलविले होते. आता हे प्रकरण वि. प. स. आमदार डॉ. परीणय फुके यांचेकडेही गेले असून ते सुद्धा सदर शेतकऱ्यांचे जनावरे परत करा असा शासनाकडे पाठपुरावा करणार. नुकतेच त्या शेतकऱ्यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे विशेष आभार मानले आहे.
याबाबत शेतकऱ्याने “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली आहे की, “आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेची आमदार नाना पटोले यांनी दखल घेतली, त्यांनी त्वरित गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन लाऊन सदर गौशाळा संचालकांना व आम्हा सर्व शेतकऱ्यांना डुग्गीपार पोलीस ठाणे येथे बोलविले होते. याबाबत सखोल चर्चा झाली. यावर आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी सुद्धा संपर्क साधला होता. अखेर दिर्घ चर्चानंतर लवकरच त्या शेतकऱ्यांची ३५ बैल त्यांच्या सुपूर्द केले जातील असा निष्कर्ष येथे निघाला. आता सदर प्रकरण हे भंडारा गोंदिया आमदार डॉ. परीणय फुके यांचे कडे सुद्धा पोहचले असून ते शेतकऱ्यांची सर्व जनावरे परत मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या सर्व प्रकरणी एक महिना लोटला तरीसुध्दा शेतकऱ्यांना बैल परत मिळाले नाही. म्हणून शेतकऱ्यांनी हा शेवटचा मार्ग अवलंबला आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची साकोलीत बुधवार ०७ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. व या पत्रकार संघाने मिडीयाला व वृत्तपत्रांतून हे वृत्त प्रकाशित केले होते. यावर प्रथम आमदार नाना पटोले यांनी दखल घेतली व आता भंडारा गोंदिया आमदार डॉ. परीणय फुके हे सुद्धा शेतकऱ्यांना बैल परत मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत. या सर्व अन्याय पिडीत १३ शेतकऱ्यांनी “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, सचिव मनिषा काशिवार, सदस्यगण ताराचंद कापगते, रवि भोंगाणे, मदन कमाने, संजय साठवणे, किशोर रंगारी, डी. जी. रंगारी, ऋग्वेद येवले व सर्व पत्रकारांचे न्याय मिळवून देण्यासाठी विशेष आभार मानले आहे.






